Chitraganda Singh:बॉलिवूडची झगमगाटी दुनिया जितकी आकर्षक दिसते, तितकीच तिची एक धोकादायक बाजूही आहे. अलीकडेच प्रमोशन करताना अभिनेत्री निधी अग्रवाल फॅन्सच्या वेढयात अडकली आणि नंतर तिला अनेकांचे नको तिथे स्पर्श होऊ लागले. घाबरलेल्या अवस्थेत अभिनेत्री कशीबशी कारपर्यंत पोहोचली. इतके सुरक्षारक्षक असतानाही अभिनेत्रीला हा विचित्र अनुभव आला होता. असे अनेक प्रकार सध्या घडताना दिसतायत. केवळ अभिनेत्रीच नाही तर अभिनेत्यांनाही अनेकदा फॅन्सच्या गर्दीचा ताप होतो. अलीकडेच घडलेल्या या घटनांवर अभिनेत्री चित्रगंदा सिंह बोलली आहे. फॅन्सच्या भयंकर अनुभवावर अभिनेत्री चित्रांगदा सिंहने ताशेरे ओढलेत. कलाकारांना अशा परिस्थितीत पोहोचूच का दिले जाते जिथे त्यांची सुरक्षा धोक्यात येईल ? असं सवाल तिने केलाय. तिने तिचाही एक गर्दीचा भयानक अनुभव शेअर केला आहे.
फॅन्सच्या गर्दीचा भयानक अनुभव, चित्रगंदानं मौन सोडलं
काही दिवसांपूर्वी निधी अग्रवाल हैदराबादमधील लुलु मॉलमध्ये तिच्या आगामी द राजा साब चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेली होती. त्यावेळी झालेल्या गर्दीमुळे अभिनेत्रीला प्रचंड मनस्ताप झाला. असंच काही समंथा रूथ प्रभू सोबतही घडलं होतं. सुरक्षारक्षकांचे कडे तोडून गर्दी सामंथाच्या दिशेने धावली. त्यामुळे अभिनेत्रीला तिथून पळ काढावा लागला. फॅन्सच्या टोकाच्या वेडेपणावर आता अभिनेत्री चित्रगंधा सिंगने मौन सोडलंय. तिच्यासोबतही घडलेल्या एका प्रसंगाबद्दल ती बोलली आहे. 'आय मी ऑर में ' चित्रपटाचा प्रमोशनवेळी दिल्लीतील एका कॉलेजमध्ये अशीच गर्दी झाली होती.
काय म्हणाली चित्रगंदा?
“गर्दी इतकी हिंसक झाली होती की जॉन अब्राहम माझ्यासाठी ढाल बनून उभा राहिला, आम्ही कसाबसा मार्ग काढत कारपर्यंत पोहोचलो तेव्हा जॉनची पाठ नखांच्या ओरखड्यांनी भरलेली होती” असं सांगत तिने कलाकारांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. तिच्या या अनुभवामुळे चाहत्यांच्या टोकाच्या वेडेपणाची भीषण वास्तविकता समोर आली आहे. तिने इव्हेंट मॅनेजमेंट आणि सुरक्षा यंत्रणांच्या नियोजनावरही ताशेरे ओढले. ती म्हणाली" कलाकारांना अशा परिस्थितीत पोहोचू का दिले जाते जिथे त्यांचे सुरक्षा धोक्यात येईल ? असं सवाल तिने केला. दहीहंडी सारख्या मोठ्या सणांच्या वेळी अनेकदा सेलिब्रेटींच्या गाड्यांवर हल्ले होतात. चाहत्या अचानक घेराव घालतात. ही परिस्थिती प्रत्यक्षात अत्यंत भीतीदायक असते असेही ती म्हणाली. दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूही अशाच परिस्थितीला सामोरी गेली होती. एका कार्यक्रमात सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी राहिल्याने चाहत्यांची गर्दी थेट तिच्याजवळ पोहोचली आणि अखेर तिला तिथून बाहेर पडावं लागलं. स्टार्सना जवळून पाहण्याची चाहत्यांची उत्सुकता समजू शकते. फोटो, सेल्फी किंवा फक्त एक झलक मिळवण्यासाठी होणारी गर्दी ही आजच्या एंटरटेन्मेंट संस्कृतीचा भाग बनली आहे. पण हीच गर्दी जेव्हा नियंत्रणाबाहेर जाते, तेव्हा सेलिब्रिटींसाठी लोकप्रियता एखाद्या संकटासारखी भासू लागते.