Jay Bhanushali and Mahi Vij: 2025 या साली अनेक सेलिब्रिटींनी काडीमोड घेतला. काहींचं लग्न मोडलं.  अनेकांनी वैयक्तिक आयुष्यात सुरू असलेल्या वादळाची माहिती चाहत्यांना देत राहिले.  गेल्या वर्षी अभिनेता जय भानुशाली आणि अभिनेत्री माही विज लवकरच विभक्त होणार असल्याची चर्चा होती. या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.  प्रसिद्ध टीव्ही जोडी माही विज आणि जय भानुशाली यांनी अखेर घटस्फोटाबाबत माहिती दिली. त्यांनी परस्पर सहमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.   त्यांचे  14 वर्षांचे वैवाहिक जीवन संपुष्टात आले आहे. ही बातमी समोर आल्यानंतर  चाहते भावूक झाले आहेत.  गेल्या काही काळापासून त्यांच्या विभक्त होण्याच्या अफवा पसरत होत्या. या चर्चांवर आता दोघांनी पूर्णविराम दिला आहे. या बातमीनंतर सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे.

Continues below advertisement

मीडिया रिपोर्ट्सनुसार,  माही विज आणि भानुशाली  या दोघांनी मिळून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.  दोघांनी स्पष्ट केले की, त्यांच्या नात्यात कोणताही दोष किंवा चूक नव्हती. त्यांनी  स्पष्ट केले की, हे वेगळे होणे नकारात्मकतेचे परिणाम नव्हते, तर, मनाची शांती, एकमेकांचे आदर आणि चांगल्या भविष्यासाठी त्यांनी घेतलेला निर्णय होता. इन्स्टाग्रामवर त्यांनी एक स्टोरी पोस्ट केली. या स्टोरीवर त्यांनी घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं.  "आम्ही आयुष्याच्या अशा टप्प्यावर पोहोचलो आहोत, जिथे आम्ही विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.  आमच्या नात्यात प्रेम, प्रगती,  समजूतदारपणा होता. आम्ही एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.  शांतीसाठी, आमच्या मुलांसाठी, आनंदासाठी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे - आम्ही एकमेकांसाठी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे", अशी पोस्ट केली आहे.

"आमचे मार्ग वेगळे झाले असले तरी,  या निर्णयात कोणीही व्हिलन नाही.  आम्ही नकारात्कम किंवा इतर कारणांमुळे घेतलेला नाही. शांती आणि उत्तम मानसिक आरोग्यासाठी आम्ही हे पाऊल उचलत आहोत. इतर कोणत्याही कारणासाठी नाही.  आम्ही एकमेकांचा आदर करत राहू. एकमेकांना पाठिंबा देत राहू.  एकमेकांसाठी प्रार्थना करत राहू. आम्ही आमच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती करतो. जेणेकरून आम्ही आमच्या आयुष्यात पुढे  जाऊ शकू - माही आणि जय भानुशाली". 

जय आणि माहीला 6 वर्षांची मुलगी आहे.  दोघे मिळून एकत्र ताराला वाढवत आहेत. माही वीज आणि जय भानुशाली यांचे 2011 साली लग्न झाले होते.  ते टीव्ही विश्वातील सर्वात आवडत्या कपलपैकी एक मानले जात होते. लग्नापूर्वी ते बराच काळ एकमेकांना डेट करत होते. नंतर त्यांनी विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला.