Mahesh Manjrekar childhood experience with RSS shakha: प्रखर हिंदुत्त्ववादी विचारसरणीसाठी ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी वर्ष सुरू आहे. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईतील नेहरू सेंटर येथे भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 7 फेब्रुवारी 2026 रोजी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत'नवे क्षितीज' या नावानं व्याख्यानमालेला सुरूवात झाली. दरम्यान,  उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सुभाष घई, रणबीर कपूर,  अश्विनी भावे, हेमा मालिनी यांच्यासह  बॉलिवूडचा भाईजान सलमान खान देखील उपस्थित होता. सलमान खानची उपस्थिती पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या. आज  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाचा दुसरा दिवस. सकाळपासूनच सिनेकलाकारांची रेलचेल पाहायला मिळत आहे.

Continues below advertisement

आज व्याख्यानमालेचा शेवटचा दिवस.  या कार्यक्रमात राजकारण, सिनेमा, साहित्य, प्रशासन यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली आहे. आज व्याख्यानमालेच्या शेवटच्या दिवशी सरसंघचालक मोहन भागवत आणि उपस्थितांमध्ये प्रश्नोत्तरे होणार आहेत.  या कार्यक्रमात अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनीही हजेरी लावली. त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपलं बालपण शाखेत गेलं असल्याचं सांगितलं.

महेश मांजरेकर म्हणतात, "माझं बालपण हे शाखेत गेलंय. मी शाखेमुळे डिसिप्लिनमध्ये राहायला शिकलो. पॅशन फॉर द नेशन  आपण असं म्हणतो, पण आता तशा शाखा होत नाहीत. लहानपणी शाखा अटेंड करून आम्हाला शिस्त लागलीये. आज ही एवढी चांगली ऑपॉर्च्युनिटी आली आहे, सोडायची नाही असं वाटलं, कारण खूप काही चांगलं ऐकायला मिळणार आहे. राष्ट्र हे आता एका वेगळ्या जागेवर आहे", असं मांजरेकर म्हणाले.

Continues below advertisement

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात अभिनेता नितीश भारद्वाज यांनीही हजेरी लावली. प्रसारमाध्यमांशी बोलताना नितीश म्हणाले, "संघाने १०० वर्ष पूर्ण केले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ख्याती जगभरात पसरली आहे. अनेक विचारधारा परावर्तित होतं आहेत. आजची व्याख्यानमाला याचसाठी आहे की, भारताला नेमकं कोणत्या दिशेने पुढे जायचं आहे", असं नितीश म्हणाले.   "भारताला दबावात येऊन निर्णय घ्यायचे असते तर, ते निर्णय आधीच समोर आले असते. भारत अमेरिका जो करार झाला आहे, यावर आता बोलणं योग्य नाही, त्यातील सगळे घटक हळूहळू पुढे येऊ द्या. स्वतः मंत्री पीयूष गोयल यावर बोलतील", असंही नितीश म्हणाले. 

 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

मोठी बातमी: सलमान खान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला पोहोचला, सगळे कॅमेरे झटक्यात भाईजानकडे वळाले