Kiran Mane On International Womens Day : आज जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन (International Womens Day) साजरा केला जात आहे. अनेक ठिकाणी महिलांसाठी खास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटकरी महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा देत आहेत. आता साताऱ्याचा बच्चन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'बिग बॉस' (Bigg Boss) फेम किरण मानेने (Kiran Mane) महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर खास पोस्ट लिहिली आहे. 


किरण मानेची पोस्ट काय आहे? (Kiran Mane Post)


किरण मानेने महिला दिनानिमित्त खास लांबलचक पोस्ट लिहिली आहे. वर्किंग वूमनचा दिनक्रम कसा असतो यावर भाष्य करणारी किरण मानेची पोस्ट लक्ष वेधून घेणारी आहे. दिनक्रमाबद्दल लिहित किरणने लिहिलं आहे,"आज अनेक वर्किंग वुमेन आपल्या आसपास आहेत. क्षेत्र कुठलंही असो... आपलं कौटुंबिक आयुष्य आणि व्यावसायिक आयुष्य यांची सांगड घालताना वर्किंग वुमनला अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. सगळ्यात महत्त्वाचा त्याग म्हणजे स्वत:साठीची वेळ". 


किरण माने लिहिलं आहे,"काम करणारे पुरुष आरामासाठी शनिवार -रविसारची वाट पाहत असतात. पण वर्किंग वुमनने हे सुट्टीचे दिवसही घरासाठी वाहिलेले असतात आणि यातूनच बॉक्सिंग किंवा कुस्तीमध्ये सुवर्णपदक पटकावण्यापासून देशाच्या राष्ट्रपतीपदापर्यंत मजल मारण्यापर्यंत काहीही करायला स्त्री सक्षम असते". 



किरण मानेने पुढे लिहिलं आहे,"कामातलं समर्पण, तल्लख बुद्धी, शिस्त आणि इच्छाशक्ती यात आम्ही कधीच स्त्रियांसोबत बरोबरी करू शकत नाही. स्त्रियांकडे संकटाशी लढण्याची आणि राखेतून विश्व उभं करण्याची असामान्य हिंमत आणि ताकद असते. या जगात जर पोलादाहून मजबूत आणि मेणाहून मऊ जर कोणी असेल तर ती 'स्त्री'. महिला दिनानिमित्त घर सांभाळून नोकरी, व्यवसाय करणाऱ्या या सगळ्या सावित्रीच्या लेकींना कडकडीत सलाम". 


'मुलगी झाली हो' या मालिकेमुळे किरण माने हे नाव चर्चेत आलं. काही कारणांनी या मालिकेतून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्यानंतर 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या (Bigg Boss Marathi 4) पर्वाच्या माध्यमातून ते घराघरांत पोहोचले. आपल्या सातारी शैलीत किरण मानेने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं. ते या पर्वाचे विजेते होणार अशी शक्यतादेखील वर्तवली जात होती. आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर ते 'टॉप 5'मध्ये पोहेचले होते. सध्या किरण माने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहेत. 


संबंधित बातम्या


International Women’s Day 2023: मनोरंजन क्षेत्रात महिलांचा डंका; जाणून घ्या पहिल्या महिला दिग्दर्शिका आणि अभिनेत्रीबाबत...