Madgaon Express Box Office Collection Day 2 : दिग्दर्शक म्हणून कुणाल खेमूने (Kunal Kemmu) 'मडगाव एक्सप्रेस' (Madgoan Express) या चित्रपटातून पदार्पण केलं आहे. हा चित्रपट 22 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. तेव्हापासूनच बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाची एक्सप्रेस सुस्साट सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. प्रेक्षकही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद देत अशल्याचं पाहायला मिळतंय. पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर (Box Office) या एक्सप्रेसचा वेग जरा मंदावला होता. पण आता या एक्सप्रेसला बॉक्स ऑफिसवर चांगलाच वेग मिळाला असल्याचं पाहायला मिळतंय. 


दिव्येंदु, प्रतिक गांधी आणि अविनाश तिवारी यांची मुख्य भूमिका असलेला मडगाव एक्सप्रेस हा चित्रपटाने दुसऱ्या दिवशीही त्याची जादू कायम ठेवलीये. फुकरे सारखा चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या फरहान अख्तर सारख्या निर्मात्याने या चित्रपटात अनेक रंजक गोष्टी टाकण्याचा प्रयत्न केलाय. चित्रपटाने पहिल्याच दिवशी 1 कोटी 50 लाख रुपयांची कमाई केली होती. 






दुसऱ्या दिवशीची कमाई किती?


सॅनसिल्कने दिलेल्या अहवालानुसार, या चित्रपटाने दुसऱ्या दिवसापर्यंत 3 कोटी रुपयांची कमाई केली. परंतु ही आकडेवारी रात्री अकरा पर्यंत असल्याने ही अंतिम आकडेवारी नसल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान चित्रपटाने दोन दिवसांत 4.50 कोटींची कमाई केल्याचं सांगण्यात येत आहे. 






मडगाव एक्सप्रेसची स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटासोबत टक्कर


कुणाल खेमू दिग्दर्शित मडगाव एक्सप्रेस या चित्रपटाची टक्कर रणदीप हुड्डाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटासोबत झाली. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर कोणता चित्रपट बाजी मारणार याची उत्सुकता सर्वांना होती. मडगाव एक्सप्रेस चित्रपटाची गोष्टही कुणाल खेमूने लिहिली आहे. तसेच या चित्रपटातील गाणी देखील त्यानेच गायली आहेत. 






ही बातमी वाचा : 


Rishabh Pant Urvashi Rautela : ऋषभ पंतसोबत संसार थाटणार उर्वशी रौतेला? अभिनेत्री म्हणाली,"जोडीदार म्हणून हवाय संस्कारी, सालस अन् साधा सरळ मुलगा"