Laxmikant Pyarelal composer wife death news: मनोरंजन सृष्टीतून अत्यंत धक्कादायक आणि दु:खद बातमी समोर येत आहे. दिग्गज आणि सदाबहार संगीतकार लक्ष्मीकांत - प्यारेलाल (Laxmikant - Pyarelal).. या जोडीतून घराघरात पोहोचलेले ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांची पत्नी सुनीला प्यारेलाल शर्मा (Sunila Pyarelal Sharma) यांचं निधन झालं आहे. त्यांनी 12 जुलै, 2026 रोजी जगाचा निरोप घेतला. 78 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला असल्याची माहिती आहे. अलीकडेच त्यांच्या कुटूंबाने (Entertainment) यासंदर्भात एक पोस्ट सोशल मीडियात शेअर केली आहे (Music Composer). त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, कुटुंबाच्या उपस्थितीत त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Continues below advertisement

बॉलिवूड गायिका प्रियांका मित्रा हिने कुटुंबाचे अधिकृत निवेदन सोशल मीडियात शेअर केला आहे. या निधनाची माहिती समोर येताच संगीत तसेच संपूर्ण जगतात शोककळा पसरली आहे. कुटुंबाने शेअर केलेल्या शोकसंदेशात म्हटलं की, 'अत्यंत दु:खाने आम्ही आमच्या प्रिय 'अम्मा' म्हणजेच सुनीला प्यारेलाल शर्मा यांच्या निधनाची घोषणा करत आहोत. 12 जुलै 2026 रोजी त्यांनी आपला देह ठेवला.  त्यांचं जीवन शांततेने परिपूर्ण होते'.

ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल यांच्या पत्नीचं निधन (Pyarelal composer wife death)

 

Continues below advertisement

'सुनीला प्यारेलाल शर्मा हे आपल्या कुटुंबासाठी आधारस्तंभ होत्या.  आज त्यांच्या जाण्याने जरी आमचे हृदय दु:खाने जड झाले असले तरी,  त्या आज शांत आहेत, या जाणि‍वेतून आम्हाला आनंद आहे', असं म्हणत त्यांच्या कुटुंबाने सुनीला शर्मा यांच्या आठवणींना उजाळा देत दु:ख व्यक्त केलं आहे. दरम्यान, कुटुंबाने सुनीला शर्मा यांच्या निधनाबद्दलही माहिती दिली.  सुनीला शर्मा यांच्यावर 13 जुलै रोजी मुंबईतील सांताक्रूझ येथील दत्तात्रय रोड स्मशाभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहे. 

या दु:खद प्रसंगी सिनेसृष्टीतील अनेक नामवंत, अभिनेते, गायक आणि नातेवाईक मुंबईत सुनीला शर्मा यांच्या अंत्य दर्शनासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. सुनीला शर्मा यांच्या निधनानंतर सोशल मीडियावरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे... .

महत्त्वाच्या इतर बातम्या:

महेश मांजरेकरांच्या पत्नीला Cancer निदान होताच लेकी झाल्या भावुक; मेधा मांजरेकरांचा Unseen फोटो शेअर करत सई म्हणाली, 'आई...'