Neeta Ambani Talks In Marathi At Ajay Atul Live Show: अजय-अतुल (Ajay-Atul) ही जोडी सध्याच्या इंडस्ट्रीतल्या लोकप्रिय संगीतकार (Popular Musician) जोड्यांपैकी एक. सिनेमात अजय-अतुलचं गाणं असलं की, तो सुपरहिट ठरलाच म्हणून समजा, असं समीकरणंच आता इंडस्ट्रीत झालंय, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या संगीतकार जोडीनं अनेक सिनेमांच्या गाण्यांना म्युझिक दिलंय. तसेच, कित्येक सुपरहिट ठरलेल्या गाण्यांना आवाजही दिलाय. नुकतीच अजय-अतुल यांच्या गाण्यांची कॉन्सर्ट (Ajay Atul Live Show) पार पडली. या कॉन्सर्टचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. त्यापैकी एका व्हिडीओनं सर्वांच लक्ष वेधून घेतलंय. हा व्हिडीओ आहे, रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांचा.
नुकत्याच पार पडलेल्या अजय-अतुलच्या कॉन्सर्टसाठी (Ajay-Atul Concerts) नीता अंबानी यांनी हजेरी लावलेली. या कॉन्सर्टमध्ये नीता अंबानी अत्यंत साध्या पण, एलिगंट अशा लूकमध्ये दिसल्या. पण, व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये त्या चक्क मराठी बोलताना दिसल्या. त्यामुळे नेटकऱ्यांकडून या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पडताना दिसतोय.
नीता अंबानी (Neeta Ambani) यापूर्वीही अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांत अस्खलित मराठीत बोलताना दिसल्यात. एका भाषणात बोलताना तर त्यांनी "मराठीतून बोलताना मला अपार आनंद मिळतो..." असं सांगत महाराष्ट्राच्या आणि मराठी भाषेच्या संस्कृतीबद्दलचं प्रेम व्यक्त केलेलं. अशातच नुकत्याच पार पडलेल्या अजय-अतुलच्या कॉन्सर्टमध्ये त्यांनी मराठीत बोलून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
नीता अंबानी मराठीत काय म्हणाल्या? (Neeta Ambani On Ajay Atul Live Show)
नीता अंबानी कॉन्सर्टमध्ये आल्यानंतर प्रेक्षकांनी जोरदार टाळ्यांचा कडकडात केला. त्यावेळी नीता अंबानी यांनी जागेवरच उभं राहत, प्रेक्षकांचे आभार मानले. त्यावेळी काही प्रेक्षकांनी नीताजी केम छो? असं म्हणत, गुजराती भाषेत त्यांना प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी तात्काळ मजामा, असं गुजरातीतच उत्तर दिलं. त्यानंतर प्रेक्षकांना 'जय श्री कृष्णा', असंही म्हणाल्या. त्यानंतर प्रेक्षकांमधून कुणीतरी त्यांना डिवचणाऱ्या सुरात काहीतरी म्हणालं, त्यावर त्यांनी तात्काळ, 'कशाला? मी मराठीत खूप चांगलं बोलते...', असं म्हणाल्या. त्यानंतर उपस्थित इतर प्रेक्षकांना टाळ्यांचा कडकडाट केला.
नीता अंबानींचा सिंपल, एलिगंट लूक (Neeta Ambani Look)
अजय-अतुल यांच्या कॉन्सर्टसाठी नीता अंबानी ट्रेडिशनल लूकमध्ये दिसल्या. त्यांनी सिंम्पल, पण एलिगंट लूक कॅरी केलेला. अजय-अतुलच्या कॉन्सर्टसाठी नीता अंबानींनी साडी नेसली होती. त्यावर अगदीच मिनिमल मेकअप केलेला. तसेच, हिऱ्यांचे दागिने वेअर केलेले. त्यांचा हा लूक खूपच एलिगंट वाटत होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
