Lata Mangeshkar : भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचा जन्म इंदौर (Indore) येथे झाला होता. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे इंदौरचे अतूट नाते आहे. त्यांचा जन्म 28 डिसेंबर 1929 रोजी इंदौरमधील शीख गल्ली येथे झाला होता. लता मंगेशकर यांची जन्मभूमी इंदौर तर, कर्मभूमी मुंबई आहे. इंदौरच्या एमजी रोडवर असलेल्या जिल्हा न्यायालयाच्या शेजारी शिख मोहल्ला आहे आणि इंदौरसह संपूर्ण देशात त्याची वेगळी ओळख आहे. या भागाला खाऊगल्ली चाट चौपाटी गल्ली असे देखील म्हटले जाते.


इंदौरची ही खाऊगल्ली लता मंगेशकर यांच्या जन्मस्थानामुळेही प्रसिद्ध आहे. त्यांचे चाहते खास लतादीदींचे जन्म ठिकाण पाहण्यासाठी या स्थळी जातात.


 







‘त्या’ दुकानातही होते विचारणा!


ज्या दुकानात लता मंगेशकर लहानपणी चाट, गुलाबजाम, रबडीचा आनंद घ्यायच्या, त्याच दुकानात जाऊन आजही लोक दुकानदाराला विचारतात की, ‘लताजींना काय काय खायला आवडायचं?’ हा दुकानदार आपल्या वडिलांकडून लताजींबद्दल ऐकलेल्या गोष्टी ग्राहकांना आणि चाहत्यांना सांगतो. मग, लोक देखील टेक पदार्थ देण्याची विनंती करतात.


लतादीदी नेहमीच गुलाबजाम, रबडी आणि खाऊगल्लीच्या चाटबद्दल विचारत असत. जेव्हाही त्यांच्या ओळखीचे लोक, त्यांना इंदौरहून मुंबईला भेटायला यायचे, तेव्हा ते लतादीदींसाठी इंदौरी सेव नमकीन नक्कीच घेऊन जायचे, कारण लताजींना इंदौरी सेव नमकीन खूप आवडायचे.


लतादीदींचे घर आता कपड्यांचे शोरूम!


इंदौरच्या शीख मोहल्ल्यातील घर क्रमांक 22, जिथे लता मंगेशकर यांचा जन्म झाला, त्या ठिकाणी आज कपड्यांचे शोरूम आहे. या शोरूममध्ये लता मंगेशकर यांचा मोठा फोटो आहे. इंदौर हे शहर आता भारतरत्न स्वरकोकिला लता मंगेशकर यांचे जन्मस्थान म्हणूनही ओळखले जा. स्वच्छतेच्या बाबतीतही हे शहर प्रथम क्रमानकावर आहे. मंगेशकर कुटुंब त्यांच्या सुरुवातीच्या संगीत शिक्षणानंतर मुंबईत स्थायिक झाले. त्यानंतर हळूहळू नातेवाईकही मुंबईत स्थायिक झाले. अनेकवेळा या रस्त्याला आणि चौकाला लता मंगेशकर यांचे नाव देण्याची घोषणा करण्यात आली, मात्र ती केवळ घोषणांपुरतीच मर्यादित राहिली आहे.


संबंधित इतर बातम्या : 


Lata Mangeshkar : 20 भाषांमध्ये तब्बल 30 हजारांहून अधिक गाणी, लता मंगेशकरांचा सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रम!


Lata Mangeshkar passes away : युग संपले! लतादीदींच्या निधनानंतर संजय राऊत यांचे ट्वीट


Lata Mangeshkar Death : गानकोकिळा लता मंगेशकर यांचे निधन, वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 


Remembering Lata Mangeshkar LIVE: स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha