Lalit Manchanda News : 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या लोकप्रिय हिंदी मालिकेतून प्रसिद्धी मिळवलेले अभिनेता ललित मनचंदा (Lalit Manchanda) यांनी गळफास घेत आयुष्य संपवलंय. त्यांनी आत्महत्या केला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशातील मेरठ येथील भावाच्या निवासस्थानी  ललित मनचंदा यांनी आयुष्याचा शेवट केलाय. ललित मनचंदा यांच्या निधनामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या जाण्याने सिनेक्षेत्रावर शोककळा पसरली आहे. 

ललित मनचंदा हे 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या कॉमेडी मालिकेत त्यांच्या भूमिकेसाठी ओळखले जात होते. त्यांनी 'क्राइम पेट्रोल' या मालिकेतही काम केले होते . त्यांच्या आकस्मिक निधनामुळे मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली आहे.​ या प्रकरणात आता पोलीस चौकशी होणार असून त्यांच्या मृत्यूच्या कारणांची सखोल चौकशी केली जाणार आहे. त्यांचा मृतदेहावर पोस्टमॉर्टेम करण्यात आला असून सोमवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले आहेत. 

टीव्ही अभिनेता ललित मनचंदा यांनी सोमवारी सकाळी लिसाडी गेट परिसरातील प्रल्हादनगर येथील भावाच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. इंडियाज मोस्ट वॉन्टेड, क्राईम पेट्रोल, मरियम, झांसी की रानी आणि ये रिश्ता क्या कहलाता है यासह अनेक मालिकांमध्ये त्यांनी सहायक अभिनेता म्हणून काम केले होते. बराच काळ काम न मिळाल्याने ते आर्थिक अडचणींचा सामना करत होते. ललित मनचंदा  12 वर्षांपासून मुंबईत राहत होते आणि टीव्ही मालिकांमध्ये सहाय्यक अभिनेता म्हणून काम करत होते. त्याचा भाऊ संजय मंचंदा हा लिसाडी गेट येथील प्रल्हादनगर परिसरात राहतो. 

अभिनेता ललित मनचंदा यांचे 21 एप्रिल 2025 रोजी उत्तर प्रदेशातील मेरठ येथील त्यांच्या भावाच्या निवासस्थानी निधन झाले.  प्राथमिक तपासणीत पोलिसांनी आत्महत्येचा निष्कर्ष काढला आहे. घटनास्थळी कोणताही सुसाइड नोट सापडलेला नाही.ललित मनचंदा यांच्या बाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. सोमवारी संध्याकाळी उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा उज्ज्वलने अंत्यसंस्काराला अग्नी दिला.

आत्महत्येची संभाव्य कारणे

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ललित मनचंदा काही काळापासून मानसिक तणाव आणि आर्थिक अडचणींशी झुंज देत होते. त्यांच्या आत्महत्येमागे हेच कारण असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

VIDEO : वर-खाली, आडव्या-तिडव्या जबरदस्त उड्या मारल्या, टायगर श्रॉफचा हवेतील बॅलेन्सला तोड नाही