Kunal Kamra Rejected Bigg Boss Offer: स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामरा (Kunal Kamara) आणि वाद काही नवे नाहीत. काही दिवसांपूर्वीच कुणाल कामरानं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Deputy CM Eknath Shinde) विडंबनात्मक गाणं गायलं आणि वादाच्या भोवऱ्यात अडकला. शिवसैनिकांचा संताप, तोडफोड, शिवीगाळ सर्वकाही कुणालच्या वाट्याला आलं. पण, तरीसु्द्धा कुणाल कामरा झुकला नाही. एकनाथ शिंदेंची माफी मागण्यासाठी अल्टिमेटम मिळूनही, त्यानं माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला. तेव्हापासूनच कुणाल पोलीस चौकशी, कोर्टाच्या फेऱ्या यामध्ये अडकला आहे. अशातच याप्रकरणी चर्चेत असतानाच आता कुणाल कामरा आणखी एका गोष्टीमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. 

Continues below advertisement


स्टँडअप कॉमेडीवेळी एकनाथ शिंदेंवर गायलेल्या विडंबनात्मक गाण्याप्रकरणी कोर्टात खटला सुरू असतानाच,  आता कुणाल कामराला बिग बॉससाठी ऑफर मिळाली आहे. कुणाल कामरा खरंच बिग बॉसच्या घरात गेला, तर काय होईल? याचा विचार आपल्या सर्वांच्या डोक्यात येण्यापूर्वीच कुणाल कामरानं बिग बॉसची ऑफर आपल्या हटके स्टाईलनं नाकारली आहे.  


कुणाल कामरानं मंगळवारी त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एका व्यक्तीसोबतच्या व्हॉट्सअॅप चॅटचा एक फोटो शेअर केला होता. ज्यात त्या व्यक्तीनं दावा केला होता की, तो बिग बॉसच्या आगामी सीझनसाठी कास्टिंगचं काम पाहत आहे. या व्यक्तीनं कुणालला येत्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होण्यासाठी ऑफर दिली होती, जी कुणालनं थेट धुडकावून लावली.  



कुणालला ती व्यक्ती म्हणाली की,  "मला माहीत आहे की, हे कदाचित तुमच्या रडारवर नसेल पण प्रामाणिकपणे सांगायचं तर, तुमची खरी शैली दाखवण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी हे एक उत्तम व्यासपीठ आहे. तुम्हाला काय वाटतं? आपण याबद्दल बोलू शकतो का?" कुणालनं यावर उत्तर दिलं की, "तिथे जाण्याऐवजी मी मेंटल हॉस्पिटलमध्ये जाणं पसतं करेल..."


दरम्यान, कुणाल कामराला 'बिग बॉसच्या' 19व्या सीझनसाठी ऑफर देण्यात आलेली की, ओटीटी वर्जनसाठी हे स्पष्ट झालेलं नाही.


कुणाल कामरा कोणत्या प्रकरणामुळे वादात अडकला? 


कुणाल कामरानं त्याच्या अलिकडच्या स्टँडअप कॉमेडी शोमध्ये काही वक्तव्य केली, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध चौकशी सुरू आहे. कुणालच्या शो दरम्यान उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनाही मुंबई पोलिसांनी अलिकडेच नोटीस बजावली आहे. कुणालच्या प्रेक्षकांमध्ये मुंबईचा एक बँकरही होता. हा बँकर अलिकडेच तामिळनाडू आणि केरळला फिरायला जाणार होता. दरम्यान, पोलिसांनी त्याला नोटीस पाठवली तेव्हा, त्याला या प्रकरणात साक्ष देण्यासाठी मुंबईला परतावं लागलं होतं. आता कुणाल कामरानं त्याच्या ट्वीटमध्ये त्याच बँकरची माफी मागितली आहे आणि त्याच्या ट्रीपचं आयोजन करण्याबद्दल बोललं आहे.


कुणाल कामरानं कोणतं विडंबनात्मक गाणं गायलं? 


कुणाल कामरानं आपल्या ट्विटर अकाउंटवरुन एक क्लिप शेअर केली. कुणाल कामरा म्हणाला की, "पहले बीजेपी से शिवसेना बाहर हो गई. फिर शिवसेना से शिवसेना बाहर हो गई. एनसीपी से एनसीपी बाहर आ गई. सब कन्फ्यूज हो गए. चालू एक शख्स ने किया था. वो मुंबई में एक बहुत बढ़िया जिला है, ठाणे वहां से आते हैं." त्यानंतर कुणालनं विडंबनात्मक गाणं गायलं...


ठाणे की रिक्षा, चेहरे पें दाढी, आँखो पे चष्मा... हाये... 
ठाणे की रिक्षा, चेहरे पें दाढी, आँखो पे चष्मा... हाये... 


एक झलक दिखलाए कभी, गुवाहाटी में छिप जाये...
मेरी नज़र से तुम देखो, गद्दार नज़र वो आए...


ठाणे की रिक्षा, चेहरे पें दाढी, आँखो पे चष्मा... हाये... 
मंत्री नहीं वो दलबदलू है, और कहा क्या जाये...?
जिस थाली में खाए, उसमें ही वो छेद कर जाए...
मंत्रालय से ज्यादा फडणवीस की गोदी में मिल जाए... 
तीर कमान मिला है इसको, बाप मेरा ये चाहे... 


ठाणे की रिक्षा, चेहरे पें दाढी, आँखो पे चष्मा... हाये...


पुढे बोलताना कुणाल कामरा म्हणाला की, "ये उनकी राजनीति है। वे पारिवारिक कलह को खत्म करना चाहते थे। उन्होंने किसी के पिता को चुरा लिया। इसका क्या जवाब होगा? क्या मैं कल तेंदुलकर के बेटे से मिलूं, भाई, चलो डिनर करते हैं। मैं तेंदुलकर की प्रशंसा करता हूं और उनसे कहता हूं, भाई, आज से वे मेरे पिता हैं।"