Kunal Kamra Controversy: स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं (Stand-Up Comedian Kunal Kamra) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) विडंबनात्मक गाणं गायलं आणि राज्याचं राजकारण पूर्णपणे ढवळून निघालं. शिवसैनिंकांनी कुणालचा शो ज्या स्टुडिओमध्ये पार पडला, तिथे जात तोडफोड केली. तसेच, कुणालला माफी मागण्यासाठी अल्टीमेटमही दिलं. कुणालनं विडंबनात्मक गाण्याचा व्हिडीओ आपल्या ट्विटर हँडलवरुन ट्वीट केला, त्यानंतर शिवसेनेच्या अनेक आमदार आणि खासदारांनीही कुणालवर जोरदार टीकेची झोड उठवली. त्यानंतर कुणालविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी कुणाल कामराची चौकशी केली. यावेळी कुणाल कामरानं पोलिसांसमोर आपला जबाब नोंदवला. चौकशीत कुणाल कामराला उपमु्ख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विडंबनात्मक गाणं गाण्यासाठी किंवा टीका करण्यासाठी पैसे मिळाले होते का? आणि तो याप्रकरणी माफी मागणार का? असे प्रश्न विचारण्यात आले. यावेळी कुणालनं पहिल्यांदाच पोलिसांसमोर आपली बाजू मांडली.
मुंबई पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीवेळी बोलताना स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा म्हणाला की, "तु्म्ही माझं बँक अकाउंट चेक करू शकता. मी सुपारी का घेऊ? आणि मी मराठीत शो केलेला नाही. मी हिंदीत शो केला आहे. मी कोणतीही सुपारी घेतलेली नव्हती आणि मला कोणीही पैसे दिलेले नव्हे."
एकनाथ शिंदेंची माफी मागणार?
चौकशीवेळी पोलिसांनी कुणालला याप्रकरणी एकनाथ शिंदेंची माफी मागणार का? अशीही विचारणा केली. यावेळी कुणाल कामरा म्हणाला की, मी पूर्ण जागसूदपणे हे वक्तव्य केलेलं आहे आणि मला याबाबत कोणताही खेद नाही. तसेच, कोणत्याही प्रकारचा पश्चाताप नाही. पुढे पोलिसांनी त्याला विचारलं की, त्याला त्याचा जबाब मागे घ्यायचा आहे का? आणि एकनाथ शिंदेंची माफी मागायची आहे का? त्यावर कुणाल म्हणाला की, जर न्यायालयानं त्याला माफी मागायला सांगितली तर तो नक्कीच माफी मागेल.
कुणाल कामरानं कोणतं विडंबनात्मक गाणं गायलं?
कुणाल कामरानं आपल्या ट्विटर अकाउंटवरुन एक क्लिप शेअर केली. कुणाल कामरा म्हणाला की, "पहले बीजेपी से शिवसेना बाहर हो गई. फिर शिवसेना से शिवसेना बाहर हो गई. एनसीपी से एनसीपी बाहर आ गई. सब कन्फ्यूज हो गए. चालू एक शख्स ने किया था. वो मुंबई में एक बहुत बढ़िया जिला है, ठाणे वहां से आते हैं." त्यानंतर कुणालनं विडंबनात्मक गाणं गायलं...
ठाणे की रिक्षा, चेहरे पें दाढी, आँखो पे चष्मा... हाये... ठाणे की रिक्षा, चेहरे पें दाढी, आँखो पे चष्मा... हाये...
एक झलक दिखलाए कभी, गुवाहाटी में छिप जाये...मेरी नज़र से तुम देखो, गद्दार नज़र वो आए...
ठाणे की रिक्षा, चेहरे पें दाढी, आँखो पे चष्मा... हाये... मंत्री नहीं वो दलबदलू है, और कहा क्या जाये...?जिस थाली में खाए, उसमें ही वो छेद कर जाए...मंत्रालय से ज्यादा फडणवीस की गोदी में मिल जाए... तीर कमान मिला है इसको, बाप मेरा ये चाहे...
ठाणे की रिक्षा, चेहरे पें दाढी, आँखो पे चष्मा... हाये...
पुढे बोलताना कुणाल कामरा म्हणाला की, "ये उनकी राजनीति है। वे पारिवारिक कलह को खत्म करना चाहते थे। उन्होंने किसी के पिता को चुरा लिया। इसका क्या जवाब होगा? क्या मैं कल तेंदुलकर के बेटे से मिलूं, भाई, चलो डिनर करते हैं। मैं तेंदुलकर की प्रशंसा करता हूं और उनसे कहता हूं, भाई, आज से वे मेरे पिता हैं।"
महत्त्वाच्या इतर बातम्या :