Budh Nakshatra Parivartan 2025 : वैदिक शास्त्रानुसार, ग्रहांचा राजकुमार बुध (Mercury) ग्रहाने नुकताच 10 डिसेंबर 2025 रोजी शनिच्या (Shani Dev) अनुराधा नक्षत्रात प्रवेश केला. बुध ग्रह या नक्षत्रात 20 डिसेंबरपर्यंत स्थित असणार आहे. शनिच्या नक्षत्रात बुध ग्रहाचं संक्रमण तीन राशीसाठी फार खास असणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, अनुराधा नक्षत्रानंतर बुध ग्रह वृश्चिक, मकर आणि कुंभ राशींच्या लोकांना चांगला लाभ देणार आहे. त्यामुळे या काळात कोणत्या राशींना (Zodiac Signs) लाभ मिळणार आहे ते जाणून घेऊयात.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
शनिच्या नक्षत्रात बुध ग्रहाचा होणारा प्रवेश वृश्चिक राशीसाठी फार शुभकारक असणार आहे. या राशीच्या लोकांचा या कालावधीत आत्मविश्वास वाढलेला दिसेल. तसेच, करिअरमध्ये चांगलं यश मिळवाल. तुमच्या अनेक रखडलेल्या योजना तुम्ही या काळात पूर्ण करु शकता. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील. तसेच, तुमच्या हाती चांगली डील लागू शकते. व्यवसायिक लोकांना या दरम्यान चांगला नफा मिळेल.
मकर रास (Capricorn Horoscope)
अनुराधा नक्षत्रात बुध ग्रहाचा होणारा प्रवेश मकर राशीच्या लोकांसाठी प्रगतीचा असणार आहे. या काळात तुम्हाला अनेक शुभवार्ता मिळतील. तसेच, तुमच्या करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक संधी निर्माण होतील. कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील. लवकरच तुमच्या हातातून शुभ कार्य घडेल. समाजात तुमच्या कार्याचं कौतुक केलं जाईल. तुमच्या कामाची प्रशंसा होईल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
शनिच्या नक्षत्रात बुध ग्रहाचं होणार संक्रमण कुंभ राशीसाठी अत्यंत शुभकारक असणार आहे. या दहा दिवसांत तुम्हाला तुमच्या कामातून समाधान मिळेल. करिअरमध्ये येणारे विघ्न दूर होतील. तसेच, तुमची रखडलेली कामे तुम्हाला वेळीच पूर्ण करता येतील. धनसंपत्तीची भरभराट होईल. या काळात कामाच्या निमित्ताने तुम्हाला फार प्रवास करावा लागेल. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. यासाठी पैशांचा जपून वापर करा. लवकरच उत्पन्नाचे दार उघडतील.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)