Miss India 2022 : कर्नाटकच्या सिनी शेट्टीनं (Sini Shetty) मिस इंडिया 2022 (Miss India 2022) चा किताब पटकावला आहे. 21 वर्षाची सिनीनं 31 फायनलिस्ट स्पर्धकांना मागे टाकत 'मिस इंडिया' झाली आहे. मिस इंडिया स्पर्धेचा भव्य कार्यक्रम रविवारी (3 जून) मुंबईत झाला जिथे सिनी मिस इंडिया 2022 बनली. इंटेलिजेंट सिनीने तिच्या सौंदर्याने आणि हुशारीने परिक्षकांची मने जिंकली.  जाणून घेऊयात मिस इंडिया 2022 स्पर्धा जिंकलेल्या सिनी शेट्टीबद्दल ....


21 वर्षीय सिनी शेट्टीचा जन्म मुंबईत झाला. नंतर ती कर्नाटकमध्ये राहते. त्यांनी अकाउंटिंग आणि फायनान्समध्ये बॅचलर डिग्री घेतली आहे. ती सध्या चार्टर्ड फायनान्शियल अॅनालिस्ट हा कोर्स करत आहे. सिनी शेट्टीला डान्सची आवड आहे. चार वर्षाची असताना सिनीनं डान्स शिकण्यास सुरुवात केली. 14 व्या वर्षी सिनीनं भरनाट्यमचे प्रशिक्षण पूर्ण केले. 


 यंदाही मिस इंडिया स्पर्धा अतिशय चुरशीची आणि मजेदार होती. स्पर्धा इतकी चुरशीची होती की, 6 परिक्षकांच्या पॅनेलनं स्पर्धकांचे सर्व पैलू लक्षात घेऊन विजेतीची निवड केली. यावेळी परिक्षकांच्या पॅनेलमध्ये मलायका अरोरा, नेहा धुपिया, दिनो मोरिया, राहुल खन्ना, रोहित गांधी आणि शामक डाबर यांचा समावेश होता. याशिवाय अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. क्रिती सॅननपासून ते इतर अनेक अभिनेत्रींनी रेड कार्पेटवर आपली जादू पसरवली. मिस इंडिया 2022 चा ग्रँड फिनाले 17 जुलै रोजी दुपारी 12 आणि 5 वाजता कलर्स वाहिनीवर प्रसारित केले जाणार आहे. 






मिस इंडिया 2022 च्या ग्रँड फिनालेमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. ज्यामध्ये नेहा धूपिया, कृति सेनन, मलाइका अरोरा, मनीष पॉल, राजकुमार राव, डिनो मोरेया, मिथाली, राज यांच्यासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.


हेही वाचा :


Miss India 2022 : कर्नाटकच्या सिनी शेट्टीनं पटकावला 'मिस इंडिया 2022'चा बहुमान