Kirron Kher : आज किरण खेर (Kirron Kher) यांचा 70 वा वाढदिवस आहे.  14 जून 1955 रोजी पंजाबमधील चंदीगड येथे किरण यांचा जन्म झाला.  किरण आणि अभिनेते अनुपम खेर हे बॉलिवूडचे पावर कपल म्हणून ओळखले जातात. त्या दोघांची लव्ह स्टोरी ही खूप फिल्मी आहे. अनेक कठिण प्रसंगांमध्ये त्या दोघांनी एकमेकांची साथ दिली. जाणून घेऊयात  किरण खेर (Kirron Kher) यांच्याबद्दल... 


किरण खेर (Kirron Kher) यांनी 1983  मध्ये रिलीज झालेल्या  'असर प्यार दा' या पंजाबी चित्रपटामधून अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केलं. 1996 मध्ये अभिनेते अमरीश पुरी यांच्यासोबत  'सरदारी बेगम'  या चित्रपटामध्ये काम केलं. या चित्रपटामधील किरण यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.  'खूबसूरत', 'दोस्ताना', 'फना', 'वीर-जारा', 'मैं हूं ना' और 'देवदास' , 'मिलेंगे-मिलेंगे', 'कमबख्त इश्क', 'कुर्बान', 'फना', 'एहसास', 'अजब गजब लव', 'खूबसूरत', 'टोटल सियापा' या हिट चित्रपटांमध्ये किरण यांनी काम केले. चित्रपटांसोबत किरण यांनी 'इसी बहाने',  'गुब्बारे' आणि 'प्रतिमा' या मालिकांमध्ये देखील काम केले. 
 
फिल्मी लव्ह स्टोरी
अनुपम खेर आणि  किरण खेर (Kirron Kher) यांची पहिली भेट चंदीगडमध्ये झाली. ते दोघे एका थिएटरमध्ये काम करत होते. दोघांमध्ये मैत्री होती. पण 1980 मध्ये किरण या मुंबईमध्ये गेल्या. तिथे किरण यांची भेट गौतम बेरी यांच्यासोबत झाली. किरण यांनी गौतम बेरी यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. अनुपम यांनी देखील लग्न केले होते. पण नंतर अनुपम आणि किरण यांची कोलकाता येथे भेटले. त्यानंतर किरण यांनी गौतम यांच्यासोबत घटस्फोट घेतला. अनुपम यांनी देखील घटस्फोट घेतला. 1985 मध्ये अनुपम आणि किरण यांनी लग्नगाठ बांधली. 
 
2021 मध्ये किरण यांना ब्लड कॅन्सरची लागण झाली. किरण यांनी कॅन्सरवर उपचार घेतले. कॅन्सरची ट्रीटमेंट घेत असतानाच 'इंडियाज गॉट टॅलेंट सीजन 9' मध्ये परीक्षक म्हणून काम केले.  


हेही वाचा :