Laapataa Ladies Beats Animal Movie :  दिग्दर्शक किरण रावचा (Kiran Rao) 'लापता लेडीज' ( Laapataa Ladies) हा यंदाच्या वर्षातील बॉलिवूडमधील चर्चेत राहिलेला चित्रपट आहे. बॉक्स ऑफिसवर चांगली  कमाई करण्यासोबत प्रेक्षकांनी चित्रपटाचे कौतुक केले. 1 मार्च महिन्यात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात कोणताही मोठा सुपरस्टार नव्हता. कमी बजेटमध्ये निर्मिती झालेल्या या चित्रपटाला चांगले यश मिळाले. 


'लापता लेडीज' हा चित्रपट 26 एप्रिल रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज झाला. ओटीटी प्लॅटफॉर्मवर या चित्रपटाला बॉक्स ऑफिसपेक्षा चांगला प्रतिसाद मिळाला. 


आता दिग्दर्शक किरण राव दिग्दर्शित चित्रपटाने मोठी कामगिरी केली आहे. लापता लेडीजने रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेला ब्लॉकबस्टर चित्रपट ॲनिमल ला पछाडले आहे. नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिलेल्या चित्रपटाच्या यादीत लापता लेडिजने दुसरे स्थान मिळवले  आहे. 






किरण रावच्या 'लापता लेडिज'चा 'ॲनिमल 'ला धोबीपछाड


दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगाचा काहीसा  वादग्रस्त ठरलेला ब्लॉकबस्टर 'ॲनिमल' नेटफ्लिक्सवर 26 जानेवारीला रिलीज झाला. Sacknilk च्या वृत्तानुसार,  या चित्रपटाला OTT प्लॅटफॉर्मवर आतापर्यंत 13.6 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. किरण रावच्या 'लापता लेडीज'ला 24 दिवसांत 13.8 दशलक्ष व्ह्यू मिळाले आहेत. आता 'लापता लेडीज'हा 2024 मध्ये नेटफ्लिक्सवर दुसरा सर्वाधिक पाहिला जाणारा भारतीय चित्रपट आहे.






13 मे ते 19 मे या आठवड्यात, 'लापता लेडीज'ला नेटफ्लिक्सवर 2.6 दशलक्ष व्ह्यूज मिळाले. या आठवड्यात, हा चित्रपट 'नेटफ्लिक्स'वर सर्वाधिक पाहिला गेलेल्या बिगर इंग्रजी भाषेतील चित्रपटांच्या यादीत पाचव्या स्थानावर आहे. 


17 दशलक्षाहून अधिक दृश्यांसह, हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणचा 'फाइटर' हा आतापर्यंत नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिला जाणारा भारतीय चित्रपट आहे. अजय देवगणचा 'शैतान' देखील वेगाने व्ह्यूज मिळवत आहे आणि नेटफ्लिक्सवर 17 दिवसांत 13 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. ''लापता लेडीज'' ज्या वेगाने प्रेक्षक मिळवत आहे, त्यानुसार लवकरच नेटफ्लिक्सवर 'फाइटर'ला मागे टाकू शकते.