मुंबई :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) बारावीचा निकाल 21 मार्च रोजी जाहीर करण्यात आला. बारावीचा निकाल (HSC Result) जाहीर झाल्यानंतर राज्यातील लाखो विद्यार्थी आणि पालकांच्या नजरा दहावीच्या निकालाकडे  (SSC Result) लागलेल्या आहेत. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दहावीचा निकाल कधी जाहीर होणार याबाबत मोठी अपडेट दिली होती. दीपक केसरकर यांनी दहावीचा निकाल 27 मे पर्यंत जाहीर होईल, अशी माहिती दिली होती. बारावीचा निकाल ज्या प्रमाणं ऑनलाईन पद्धतीनं जाहीर करण्यात आलेला होता. तिचं  पद्धत दहावीच्या निकालासाठी वापरली जाते. विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी बारावी आणि दहावीचा निकाल प्रथम ऑनलाईन पद्धतीनं जाहीर केला जातो आणि काही दिवसांनतर निकालाची छापील प्रत विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित महाविद्यालयात उपलब्ध होईल.


बोर्ड निकाल कुठं जाहीर करणार?


महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल ऑनलाईन पद्धतीनं जाहीर केला जाईल. महाराष्ट्र बोर्डाकडून निकाल ज्या वेबसाईटवर जाहीर करण्यात येणार त्याची संभाव्य यादी पुढील प्रमाणं


1. mahresult.nic.in
2. www.mahahsscboard.in
3. https://results.digilocker.gov.in
4. http://results.targetpublications.org


दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल डिजीलॉकरमध्ये सेव्ह करुन ठेवता येईल. डिजीलॉकरमध्ये निकाल जतन करुन ठेवल्यास विद्यार्थ्यांना पुढं फायदा होऊ शकतो. दहावीच्या विद्यार्थ्यांना maharesult nic in  यासह इतर वेबसाईटवर निकाल उपलब्ध होईल. 


लाखो विद्यार्थी पालकांचं लक्ष


महाराष्ट्रात दहावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत  2023-24 या शैक्षणिक वर्षात वाढली आहे. राज्यातील विविध विभागीय मंडळांत विविध शाळांमधून  दहावीला 16 लाख 9 हजार 444  विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. दहावीची परीक्षा 1 ते 26 मार्च दरम्यान पार पडली होती.  पुणे ,नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर , अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या विभागीय मंडळांकडून परीक्षेचं आयोजन केलं जातं. 


बारावीचा निकाल जाहीर, दहावीच्या निकालाची प्रतीक्षा


महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्याकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. आता दहावीचा निकाल कधी जाहीर होतो याकडे विद्यार्थ्यांचं लक्ष लागलंय. तर, अकरावी प्रवेशाची नोंदणी प्रक्रिया देखील 24 मे पासून सुरु होणार आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावी प्रवेश प्रक्रियेला वेग येणार आहे. 


संबंधित बातम्या : 



 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI