Kiran Mane on Mamata Banerjee :  कोलकात्यासह संपूर्ण देश 9 ऑगस्ट रोजी घडलेल्या घटनेमुळे पुरता हादरुन गेला.  कोलकाता येथील आरजी कर मेडिलक कॉलेज आणि हॉस्पिटलमधील एका पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेवर बलात्कार करुन तिची निर्दयी हत्या करण्यात आली. या घटनेनंतर पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यावरही बराच रोष व्यक्त करण्यात येत होता. त्यातच ममता बॅनर्जी यांनी 16 ऑगस्ट रोजी कोलकाताच्या रस्त्यांवर निषेधार्थ रॅली काढली. त्यावर आता मराठी अभिनेते आणि ठाकरे गटाचे नेते किरण माने (Kiran Mane) यांची पोस्ट चर्चेत आली आहे. 


पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी सीबीआयला देखील लवकरात लवकर चौकशी पूर्ण करण्याचेही निर्देश दिलेत. पण त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी महुआ मोइत्रा, सयानी घोष, रचना बनर्जी, शताब्दी रॉय, शशि पांजा, लवली मोइत्रा, अदिति मुंशी यांच्यासह कोलकाताच्या रस्त्यांवर या घटनेचा तीव्र निषेध करणारी रॅली काढली. 


"ममता बॅनर्जींनी काढलेला मोर्चा हे निव्वळ 'ढोंग"


किरण माने यांनी पोस्टमध्ये म्हटलं की, 'कोलकता रेप मर्डर केसमधल्या भगिनीला न्याय मिळावा म्हणून ममता बॅनर्जींनी काढलेला मोर्चा हे निव्वळ 'ढोंग' आहे. अरे ! तुम्ही मुख्यमंत्री आहात मॅडम. पोलीस आणि प्रशासन तुमच्या एका आदेशावर कामाला लागायला पाहिजे. राज्याच्या प्रमुखांनीच आंदोलन आणि धरणे वगैरे करणं यापेक्षा भयाण हास्यास्पद प्रकार दुसरा असू शकत नाही. एक महिला असुन या प्रकाराकडे अक्षम्य दुर्लक्ष करणार्‍या ममताजींचा त्रिवार निषेध !'


'देशच आज सगळ्यात घृणास्पद कालखंडातून चाललाय'


पुढे किरण माने यांनी म्हटलं की, 'हा देशच आज इतिहासातल्या सगळ्यात घृणास्पद कालखंडातून चालला आहे.लाल किल्ल्यावरून भाषण करताना 'आम्ही भ्रष्टाचार आणि महिलांवरील अत्याचार खपवून घेणार नाही' असं म्हणत जणू स्वत:लाच ट्रोल करणारे मोदीसुद्धा ममता बॅनर्जींसारखेच अशा ढोंगीपणाचे साक्षात बादशहाच ! एकिकडे मणिपूरसारख्या भयानक घटना घडूनही तिकडे न फिरकणार्‍या... कर्नाटकात तीन हजार महिलांवर बलात्कार करणार्‍याला उमेदवारी देणार्‍या... कुस्तीगीर महिलांचे लैंगिक शोषण करणार्‍याला वाचवणार्‍या भ्रष्ट आणि नीच नराधमांनी देशाचं नरडं आवळलंय... तर दुसरीकडे बंगालसारख्या ज्या राज्यातल्या जनतेनं हुशारीनं ही अन्यायी क्रूर पिलावळ दूर ठेवली आणि ममताजींना सत्तेत बसवलं, त्यासुद्धा अशा नौटंकीबाज निघाव्यात हे केवढं मोठं दुर्दैव !' 


'जनतेनं न्यायासाठी कुणाकडं बघायचं?'


'भक्तडुक्करपिलावळीला आणि चाटू मिडीयाला तर जिथं भाजपाचे सरकार नाही, तिथलेच फक्त 'सिलेक्टिव्ह' अत्याचार दिसतात...किंवा अत्याचार करणारा मुस्लीम असला तर यांचं तोंड आणि बुड सगळंच पेटून उठतं... इतरवेळी यांच्या बहिणींची रस्त्यात धिंड निघाली तरी हे सत्ताधार्‍यांची बाजू घेऊन तिला देशद्रोही ठरवत खदाखदा हसतील. अशा नालायक लोकांच्या भवतालात गुरफटलेल्या जनतेनं न्यायासाठी कुणाकडं बघायचं? कुणाचा आधार मागायचा?? हे असंच चालू राहिलं तर आपल्याकडं श्रीलंका आणि बांग्लादेशपेक्षा भयानक उद्रेक होऊ शकतो. सत्ताधार्‍यांनो, जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. ये कुर्सी है, तुम्हारा जनाज़ा तो नहीं है...  कुछ कर नहीं सकते तो उतर क्यों नहीं जाते !' असं म्हणत किरण माने यांनी या घटनेचा तीव्र निषेध केलाय. 



नेमकं काय घडलं?


शुक्रवार 9 ऑगस्ट रोजी हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये एका महिला डॉक्टरचा मृतदेह आढळल्यानंतर कोलकातामध्ये खळबळ उडाली आहे. शासकीय आरजी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या एका 31 वर्षीय पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर गुरुवारी रात्री लैंगिक अत्याचार करून खून करण्यात आल्याचा आरोप आहे. चेस्ट मेडिसिन विभागाच्या सेमिनार हॉलमध्ये अधिकाऱ्यांनी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थीनीचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला. महिला डॉक्टरच्य मृतदेहावर अनेक जखमांच्या खुणा होत्या. 


ही बातमी वाचा : 


Shilpa Shetty On Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे रोखठोक मत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...