Khushbu Sundar comeback movie Subedaar release date: फिल्म इंडस्ट्रीत कमबॅक हा नेहमी चर्चेचा विषय ठरतो. कोणताही कलाकार कमबॅक करत असेल तर, तो कायम प्रकाशझोतात येतो. दरम्यान, अशीच एका अभिनेत्रीच्या कमबॅकची प्रचंड चर्चा होत आहे. ती लवकरच अनिल कपूरच्या आगामी चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे. दिवंगत अभिनेता धर्मेंद्रसोबत स्क्रीन शेअर करत या अभिनेत्रीनं सिनेसृ्ष्टीत पाऊल ठेवलं होतं. चार दशके ही अभिनेत्री सिनेसृष्टीत सक्रीय होती. नंतर तिनं ब्रेक घेतला. आता ती पुन्हा अनिल कपूरच्या 'सुबेदार' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पुनरागमन करणार आहे. खुशबू सुंदर असे अभिनेत्रीचे नाव असून, तिची प्रचंड चर्चा होत आहे. तिची कारकिर्द नेमकी कशी होती? जाणून घेऊयात.
खुशबू सुंदर या अभिनेत्रीनं 'द बर्निंग ट्रेन' या चित्रपटातून बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. याआधी तिनं साऊथ इंडस्ट्रीतील चित्रपटात काम केलं होतं. त्यानंतर तिनं हिंदी चित्रपटसृष्टीत प्रमुख भूमिकांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवले. तिला अनेक चित्रपटातून प्रसिद्धी मिळाली. दरम्यान, तिनं काही काळासाठी सिनेसृष्टीतून ब्रेक घेतला होता. आता ती पुन्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती 'सुबेदार' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.
'सुबेदार' या चित्रपटात अभिनेत्री खुशबू अनिल कपूरच्या पत्नीची भूमिका साकारताना दिसणार आहे. 'सुबेदार' हा चित्रपट 5 मार्च रोजी, ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइम व्हिडिओवर ऑनलाइन स्ट्रीम केला जाणार आहे.
खुशबू सुंदरचा जन्म 29 सप्टेंबर 1970 रोजी मुंबईतील एका मु्स्लिम कुटुंबात झाला होता. नखत खान असे तिचे खरे नाव आहे. चित्रपटसृष्टीत स्वत:ला स्थापित करण्यासाठी खुशबूने मुस्लिम धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला होता. आता तिला बेबी खुशबू म्हणूनही ओळखले जाते.
खुशबू सुंदरला दिग्दर्शक आणि अभिनेता राज कपूर यांचा 'राम तेरी गंगा मैली' या कल्ट क्लासिक चित्रपटात भूमिका करण्याची ऑफर देण्यात आली होती. अभिनेत्रीने या चित्रपटासाठी एक फोटोशूटही केले होते. दरम्यान, तिचे वय कमी असल्याकारणाने, मंदाकिनीला चित्रपटात कास्ट करण्यात आले. खुशबूने एका मुलाखतीतून याचा खुलासा केला.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
बिग बॉसच्या घरातून कुणाचा होणार पत्ता कट? 4 स्पर्धकांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, राखी सावंत जाणार?
