Bigg Boss Marathi Season 6 Week 7 elimination: बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनमध्ये स्पर्धकांची धम्माल पाहायला मिळत आहे. ड्रामा, भांडणं, मैत्री आणि घरात फुललेलं प्रेम, यामुळे शोमधील रंगत अधिक वाढत चालली आहे.   हा शो सध्या बऱ्याच कारणांमुळे चर्चेत आहे. ज्या दिवशी ड्रामा क्विन राखी सावंतने घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री केली, तेव्हापासून या शोमध्ये मनोरंजनाचा तडका पाहायला मिळत आहे.  

Continues below advertisement

करण सोनवणे आणि आयुष संजीव  हे दोघेही एकाच वेळी घरातून बाहेर पडले.  दोन स्पर्धकांना एलिमिनेट केल्यामुळे स्पर्धकांसह प्रेक्षकांना मोठा धक्का बसला.  दरम्यान,  गेल्या आठवड्यात सचिन कुमावतला घरातून बाहेर पडावं लागलं. अनेकांनी आश्चर्य व्यक्त केली. दरम्यान, या आठवड्यात नेमकं  कुणाला नारळ देण्यात येणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.  तीन सदस्यांपैकी एक सदस्याला गेममधून एलिमिनेट करण्यात येईल, अशी माहिती समोर येत आहे.

बिग बॉसच्या घरामध्ये अनेक टास्क दाखवले जात आहे.  टास्कमुळे शोची अधिक रंगत वाढत चालली आहे. सहाव्या आठवड्यात सचिन कुमावतला घरातून बाहेर पडावं लागलं. दरम्यान, सातव्या आठवड्यात नेमकं कोण एलिमिनेट होणार? याकडे प्रेक्षकांच्या नजरा आहेत. सातव्या आठवड्यात एकूण 4 स्पर्धकांना एलिमिनेशनसाठी नॉमिनेट करण्यात आले आहे. स्पर्धा अधिक आव्हानात्मक ठरत आहे.  दरम्यान, चार स्पर्धकांना एलिमिनेशनसाठी नॉमिनेट करण्यात आल्यामुळे, या शोमध्ये अधिक नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.  बिग बॉसच्या सातव्या सिझनमध्ये आणखी एक धक्कादायक एक्झिट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

Continues below advertisement

 

बिग बॉसच्या सातव्या आठवड्यात अनेक पॉवरफूल स्पर्धक धोक्यात आले आहेत. या आठवड्यात दिग्गज कलाकारांपैकी एक सदस्य घरातून बाहेर पडण्याची शक्यता आहे.  राकेश बापट, रोशन भजनकर, राखी सावंत आणि प्राजक्ता शुक्रे या स्पर्धकांची नावे एलिमिनेशनसाठी नॉमिनेट करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.  या चार स्पर्धकांपैकी एका कलाकाराला बिग बॉसच्या घरातून निरोप घ्यावा लागेल.  सातव्या आठवड्यात नेमकं कोणता स्पर्धक घरातून बाहेर पडणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. सध्या व्होटिंग लाइन्स ओपन आहेत. चाहते त्यांच्या आवडत्या घरातील सदस्यांना  27 फेब्रुवारी दुपारी 12 वाजेपर्यंत मतदान करु शकतात.