Krishna G Rao Passes Away : KGF फेम कृष्णा जी राव (KGF G Rao) यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरु होती. मात्र, अखेर बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली. कृष्णाजी राव यांचे बंगळुरू येथील रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या जाण्याने मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून साऊथ इंडस्ट्रीमध्ये कार्यरत असलेले ते प्रसिद्ध कलाकार होते. कृष्णा जी राव यांनी वयाच्या 70 व्या वर्षीदेखील केजीएफमध्ये मुख्य भूमिका साकारली होती. केजीएफ चॅप्टर 1 नंतरही त्यांनी जवळपास 30 सिनेमांमध्ये काम केलं.
कृष्णा जी राव यांना काही दिवसांपूर्वी बेंगळुरूमधील सीता सर्कलजवळील विनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. अखेर, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
KGF मध्ये कृष्णा जी राव यांची ही भूमिका होती
यश स्टारर आणि प्रशांत नील दिग्दर्शित KGF नंतर कृष्णा जी राव यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यांनी KGF मध्ये एक विशेष भूमिका साकारली ज्यानंतर रॉकी (यश) च्या कथेला एक वळण मिळते. यशच्या चित्रपटात त्यांनी एका अंध वृद्धाची भूमिका साकारली होती, ज्यामुळे रॉकीमधील माणुसकी जागृत झाली होती.
कृष्णा यांनी अनेक वर्ष इंडस्ट्रीत काम केले. तसेच, अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिकांमध्ये काम केले. दिवंगत अभिनेते शंकर नाग यांच्याबरोबर अनेक दशके सहाय्यक दिग्दर्शक त्यांनी म्हणून काम केले. मात्र, KGF मध्ये कृष्णा जी यांनी वृद्ध अंध व्यक्तीची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली.
अशाप्रकारे कृष्णाजी राव यांना KGF मिळाला
मीडिया रिपोर्ट्सनुसार, KGF Chapter 1 2018 मध्ये रिलीज झाला होता. यानंतर राव यांनी जवळपास 30 चित्रपटांमध्ये बॅक टू बॅक काम केले. एका मुलाखती दरम्यान त्यांना केजीएफ कसा मिळाला? या संदर्भात प्रश्न विचारला असता. कृष्णाजी राव यांनी सांगितले की, एके दिवशी त्यांना ऑडिशनसाठी कॉल आला आणि त्यांनी या ऑडिशनमध्ये सर्वांना आश्चर्यचकित केले. त्यानंतर निर्मात्यांनी लगेचच राव यांना भूमिका ऑफर केली.
महत्त्वाच्या बातम्या :