KGF Chapter 2 : साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये ‘रॉकिंग स्टार’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभिनेता यशची (Yash) फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. या अभिनेत्याच्या चित्रपटांची प्रेक्षकांमध्ये किती क्रेझ आहे, याचा अंदाज त्याच्या KGF 2 चित्रपटाच्या सोशल मीडियावरील ट्रेंडवरून लावता येतो. लोक त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, निर्मात्यांनी यशच्या चाहत्यांना एक मोठी भेट दिली आहे. KGF 2 मधील 'तूफान' (Toofan) हे गाणे सोमवारी (21 मार्च) रिलीज झाले आहे.


या गाण्यात आपल्या आवडत्या अभिनेत्याची झलक पाहून चाहते खूप खूश आहेत. हे गाणे शब्बीर अहमद यांनी लिहिले आहे. याला संगीत रवी बसरूर यांनी दिले आहे. दक्षिण भारतातील काही चित्रपटांनी हिंदी पट्ट्यातील बॉक्स ऑफिसवर आपली ताकद दाखवली आहे. अशा चित्रपटांमध्ये KGF देखील समाविष्ट आहे, ज्याचा दुसरा भाग KGF Chapter 2 पुढील महिन्यात थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.


पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला


KGF 2 हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे, ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या चित्रपटाचे प्रमोशन सुरू झाले असून सोमवारी (21 मार्च) चित्रपटाचे पहिले गाणे ‘तुफान’ रिलीज करण्यात आले. KGF Chapter 2 हा चित्रपट कन्नड, तमिळ, तेलुगु, मल्याळम तसेच हिंदीमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याचे पहिले गाणेही पाच भाषांमध्ये रिलीज झाले आहे. या गाण्याचा व्हिडीओ चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नील यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. हे गाणे चित्रपटातील यशच्या ‘रॉकी’ या व्यक्तिरेखेची ओळख करून देते. चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे, तर ट्रेलर 27 मार्च रोजी रिलीज होणार आहे.



पाहा गाणे :



या गाण्यात अभिनेता यशच्या दमदार अभिनयाची झलक पाहायला मिळाली आहे. हे गाणे रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे. गाण्याचे बोल आणि ताल लोकांना खूप आवडले आहे. या चित्रपटात संजय दत्त खलनायक ‘अधीरा’च्या भूमिकेत दिसणार आहे, तर रवीना टंडन एका राजकारण्याच्या भूमिकेत दिसणार आहे. KGF 2 चित्रपट पाहिल्यानंतर, चित्रपटाची पुढची कथा जाणून घेण्यासाठी लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. KGF Chapter 2 14 एप्रिल रोजी तेलुगु, तमिळ, कन्नड, हिंदी आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha