Kesari 2 Box Office Collection Day 4: अक्षय कुमारचा (Akshay Kumar) चित्रपट 'केसरी चॅप्टर 2' (Kesari Chapter 2) आधीच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे आणि सनी देओलचा (Sunny Deol) चित्रपट 'जाट' बॉक्स ऑफिसवर (Box Office) चांगलाच गाजतोय. तरण आदर्श यांच्या मते, चित्रपटाला फक्त 1000 स्क्रीन्स देण्यात आल्या आहेत आणि तरीही, चित्रपटानं पहिल्या 3 दिवसांत बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. जवळजवळ डझनभर फ्लॉप चित्रपट देणाऱ्या अक्षय कुमारसाठी हा चित्रपट उत्तम कमबॅक ठरला आहे. बहुतेक समीक्षकांनी चित्रपटाचं कौतुक केलं आहे. तसेच, अक्षय कुमारच्या अभिनयाचंही कौतुकही करण्यात आलंय.
कमी स्क्रीनवर प्रदर्शित झाला असला तरी, 'केसरी 2' चांगलं कलेक्शन करत आहे. चित्रपटाच्या आजच्या कमाईचे म्हणजेच, चौथ्या दिवसाच्या कमाईचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत, जाणून घेऊया चित्रपटानं आतापर्यंत किती कमाई केली? त्याबाबत सविस्तर...
'केसरी चॅप्टर 2'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन
अधिकृत आकडेवारीनुसार, 'केसरी चॅप्टर 2'नं दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी पहिल्या दिवसापेक्षा जास्त कमाई केली. या चित्रपटानं तीन दिवसांत 29.62 कोटींची कमाई केली. खालील तक्त्यामध्ये तुम्ही चित्रपटाची दैनिक कमाई स्वतंत्रपणे पाहू शकता.
| दिवस | कोट्यवधींमध्ये |
| Kesari Chapter 2 Box Office Collection Day 1 | 7.84 |
| Kesari Chapter 2 Box Office Collection Day 2 | 10.08 |
| Kesari Chapter 2 Box Office Collection Day 3 | 11.70 |
| Kesari Chapter 2 Box Office Collection Day 4 | 4.50 |
| Kesari Chapter 2 Total Box Office Collection | 34.12 |
कृपया लक्षात घ्या की, टेबलमधील आजच्या कमाईशी संबंधित आकडे SECNILK नुसार आहेत आणि अंतिम नाहीत. हे आकडे सकाळी 10:20 वाजेपर्यंतचे आहेत आणि त्यात बदल होऊ शकतात.
'केसरी चॅप्टर 2' नं आज किती चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले?
या वर्षी एकूण 14 बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. यापैकी, 'केसरी चॅप्टर 2' हा 4 मोठ्या चित्रपटांपेक्षा मागे आहे, ज्यात 'छावा' (600 कोटींपेक्षा जास्त कलेक्शन), 'सिकंदर' (सुमारे 110 कोटी), स्काय फोर्स (112.75 कोटी) आणि सनी देओलचा 'जाट' (सुमारे 77 कोटी) यांचा समावेश आहे, जो सध्या बॉक्स ऑफिसवर गाजत आहे.
याशिवाय, 'केसरी चॅप्टर 2'नं सोमवारी एकूण 8 चित्रपटांच्या आयुष्यभराच्या कमाईला मागे टाकलं आहे, ज्यात 'इमर्जन्सी' (18.35 कोटी), 'आझाद' (6.35 कोटी), 'लवयापा' (6.85 कोटी), 'बॅडअॅस रविकुमार' (8.38 कोटी), 'मेरे हसबंड की बीवी' (10.31 कोटी), 'क्रेझी' (13.99 कोटी), 'फतेह' (13.35 कोटी) आणि 'सुपरबॉईज ऑफ मालेगाव' (2.15 कोटी) यांचा समावेश आहे. या चित्रपटानं आज 'देवा' (33.9 कोटी) लाही मागे टाकलं आहे.
आता फक्त 'द डिप्लोमॅट' (35.9 कोटी) उरला आहे, ज्याचा विक्रम उद्यापर्यंत 'केसरी 2' मोडेल. जर असं झालं, तर 'जाट' नंतर, 'केसरी 2' हा या वर्षी प्रदर्शित झालेल्या 10 चित्रपटांचा विक्रम मोडणारा दुसरा बॉलिवूड चित्रपट ठरेल.
दरम्यान, अभिनेता करण सिंह त्यागी दिग्दर्शित, अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट 150 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. या चित्रपटात आर. माधवन आणि अनन्या पांडे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा जालियनवाला बाग हत्याकांड आणि त्यानंतर झालेल्या कायदेशीर लढाईवर आधारित आहे, ज्यामध्ये अक्षय कुमार सी. शंकरन नायरच्या भूमिकेत दिसला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :