Horoscope Today 22 April 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 22 एप्रिल 2025, म्हणजेच आजचा वार मंगळवार. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान श्रीगणेशाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीसाठी आज काही वेळेस शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते, याचा अनुभव घेणार आहात.

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांनो आज तुम्हाला नाविन्याची आवड आहे, त्याला खत पाणी देणारे ग्रहमान आज मिळणार आहे

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांनो आज मी म्हणेल ती पूर्व दिशा हे तुमच्या विचार आणि कृतीतून तुम्ही दाखवून द्याल

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांनो आज नोकरी धंद्यात वरिष्ठांच्या अनाकलनीय वागण्यामुळे गोंधळून जाल  

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांनो आज योग्य नियोजन आणि कामाची तत्परता यामुळे नोकरी व्यवसायात यश मिळेल 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांनो आज तरुणांना प्रिय व्यक्तीचा सहवास हवासा वाटेल परंतु घरातील मोठ्या व्यक्तींच्या शिस्तीमुळे बंधन येईल 

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांनो आज कष्ट करण्याचा दिवस आहे त्यामुळे थोडी चिडचिड होईल 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज महिलांनी मुलांच्या तब्येतीकडे लक्ष देणे जरुरीचे ठरेल 

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांनो आज कामाच्या वेळी काम आणि आरामाच्या वेळी आराम हे सूत्र लक्षात ठेवा 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांनो आज नैसर्गिक समतोल आहार घेण्यावर भर द्या, व्यायामात नियमितपणा ठेवायला हवा 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांनो आज ज्यांना व्यसन आहेत, त्यांनी त्याला बांध घालावा, आत्मविश्वासाला अहंकाराचा लेप दिला तर तोटा होण्याची शक्यता जास्त 

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांनो आज समस्या सोडवण्यासाठी समस्यांचा प्राधान्यक्रम ठरवा आणि भावनांवर नियंत्रण ठेवून तर का शुद्ध विचार करून काम करा

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.)