kaun banega crorepati 17 : महानायक अमिताभ बच्चन सध्या आपल्या रिअॅलिटी शो ‘कौन बनेगा करोडपती’ मुळे चर्चेत आहेत. नुकत्याच झालेल्या एका भागामध्ये बिग बींनी दिल्ली येथून आलेल्या स्पर्धक कशिशला 1 कोटी रुपयांसाठी असा प्रश्न विचारला ज्याचे उत्तर ती देऊ शकली नाही. मात्र, तिचा खेळ आणि तिची भावनिक कहाणी प्रेक्षकांचे मन जिंकून गेली.
‘केबीसी’ मधील पहिला 1 कोटी रुपयांचा प्रश्न कोणता होता?
‘केबीसी’च्या 17 व्या सिझनमध्ये दिल्लीची कशिश हॉट सीटवर बसली होती. तिने आपली भावनिक कहाणी सांगून सर्वांना प्रभावित केले. कशिश केवळ 21 वर्षांची असली तरी तिची स्वप्ने खूप मोठी आहेत. तिला आपल्या आई-वडिलांना सेटल करायचे आहे आणि त्यांच्यावर असलेले कर्ज फेडायचे आहे. तिने खेळ सुरू करताच आपल्या बुद्धीमत्तेने सर्वांचे मन जिंकले. तिचे सातत्याने उत्तम प्रदर्शन पाहून बिग बी देखील खूश होते.
कशिशने जेव्हा 25 लाख रुपये जिंकले, तेव्हा तिने आपल्या वडिलांना सांगितले की आता ती संपूर्ण कर्जफेड करू शकेल. त्यानंतर तिने 50 लाख रुपयांची कमाईही केली. मात्र 1 कोटी रुपयांच्या प्रश्नावर तिचा विजयाचा प्रवास थांबला. अमिताभ बच्चन यांनी कशिशला असा प्रश्न विचारला की – “विसीगोथचा कोणता राजा शहरावरील वेढा उठवण्यासाठी प्राचीन रोमकडून खंडणी म्हणून भारतातून येणारी काळी मिरी मागत होता?”
1 कोटी रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर काय होते?
या प्रश्नासाठी कशिशला चार पर्याय दिले गेले –(a) लूडोविक(b) एमेरिक(c) अलारिक(d) थियोडोरिक
तिने उत्तर शोधण्यासाठी आपली शेवटची उरलेली लाइफलाइन ‘संकेत सूचक’ वापरली. पण त्यानंतरही ती योग्य उत्तर देऊ शकली नाही. प्रश्नाचे उत्तर न समजल्यामुळे तिने शहाणपणाने निर्णय घेत खेळ सोडण्याचे ठरवले.
तिने ‘केबीसी’मधून 50 लाख रुपयांची बक्षीस रक्कम जिंकली. मात्र बिग बींनी निरोप घेताना तिला या 1 कोटी रुपयांच्या प्रश्नाचे योग्य उत्तरही सांगितले. त्याचे बरोबर उत्तर होते – (c) अलारिक. कशिशला हे उत्तर देता आले नाही. तरीसुद्धा अमिताभ बच्चन तिच्या खेळावर खूप खूश झाले आणि निरोप घेताना तिला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
इतर महत्त्वाच्या बातम्या