मुंबई : 'कौन बनेगा करोडपती'चा 15वा (Kaun Banega Crorepati 15) सीझन संपला आहे. या सीझनचा शेवटचा एपिसोड 29 डिसेंबर रोजी प्रसारित करण्यात आला. यावेळी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे भावून झाल्याचं पाहायला मिळालं. शर्मिला टागोर, सारा अली खान आणि विद्या बालन 'KBC 15' च्या शेवटच्या एपिसोडमध्ये दिसल्या होत्या. शर्मिला टागोर आणि विद्या बालन यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या अनेक सुंदर आठवणी या निमित्ताने शेअर केल्या. पण जेव्हा निरोप घेण्याची वेळ आली तेव्हा अमिताभ बच्चन यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. 


कौन बनेगा करोडपती 15 ची सुरुवात 18 एप्रिल 2023 रोजी मोठ्या धूमधडाक्यात झाली. हा सीजन एक दिवस संपणार याची जाणीव अमिताभ यांना होती पण  स्पर्धक आणि प्रेक्षकांच्या आनंदासमोर त्यांनाही या गोष्टीचा विसर पडला. ही गोष्ट त्यांनी मान्य देखील केली.अमिताभ 'केबीसी'मधील प्रत्येक स्पर्धकासोबत मजा करताना आणि त्यांच्या आयुष्यातील आणि करिअरमधील मजेशीर किस्से प्रेक्षकांसोबत शेअर करताना दिसले.त्यांनी या सीजनदरम्यान खळखळून हसवलं. पण जेव्हा 'कौन बनेगा करोडपती 15'ला निरोप देण्याची वेळ आली तेव्हा त्यांचा भावना दाटून आल्या आणि त्यांना अश्रू अनावर झाले. 


'अपनों से ये कह पाना कि कल से हम यहां नहीं आएंगे, मुश्किल होता है...'


अमिताभ यांनी भावूक यांनी म्हटलं की, देवी और सजनों आता आम्ही निघतोय. उद्यापासून हा मंच सजणार नाही. उद्यापासून इथे येणार नाही हे आपल्या प्रियजनांना सांगण्यासाठी हिंमत लागते आणि ही गोष्ट त्यांना सांगाविशी वाटत देखील नाही. मी, अमिताभ बच्चन, या सीजनमध्ये शेवटच्या वेळी या मंचावरून म्हणणार आहे - शुभ रात्री. त्यानंतर अमिताभ यांना अश्रू अनावर झाले. 


प्रेक्षकांची भावनिक प्रतिक्रिया


अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेक्षकांनीही भरभरून प्रेमाचा वर्षाव केला. भावूक झालेले अमिताभ सगळ्यांकडे बघत राहिले आणि ऐकत राहिले. यावेळी प्रेक्षकांपैकी एकाने म्हटलं की, आमच्यापैकी कोणीही देव पाहिला नाही. पण आम्हाला देवाच्या सर्वात जवळच्या व्यक्तीला पाहण्याचं भाग्य मिळालं. 






हेही वाचा : 


Kaun Banega Crorepati 15: 'कौन बनेगा करोडपती 15' शोमध्ये बिहारचा अविनाश जिंकू शकला नाही एक कोटी; तुम्हाला माहितीये का या प्रश्नाचं उत्तर?