Katrina Kaif first Holi after becoming mother: 3 मार्च रोजी होळी हा सण अगदी उत्साहात साजरा करण्यात आला. गल्लोगल्ली रंगीबेरंगी चेहरे पाहायला मिळाले. सेलिब्रिटींची देखील होळी जोरदार झाली. अभिनेत्री कतरिना कैफसाठी यंदाची होळी खास होती. कारण मुलगा विहानच्या जन्मानंतर तिनं पहिल्यांदाच होळी हा सण साजरा केला. दरवर्षीप्रमाणे यंदाही तिनं  स्विमिंग पूलजवळ आपल्या फॅमिलीसह  होळी हा सण साजरा केला.  पती विक्की कौशल, दीर सनी कौशल आणि बहीण इसाबेल कौशल यांच्यासोबत तिनं हा सण उत्साहात साजरा केला. कतरिनाने होळीचे काही खास फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. आई झाल्यानंतर कतरिनाच्या चेहऱ्यावर खास ग्लो पाहायला मिळत आहे. 

Continues below advertisement

कतरिना कैफने होळीचे फोटो सोशल मीडियात शेअर केले आहेत. तिनं फोटो शेअर करुन, चाहत्यांना कॅप्शनद्वारे होळीच्या शुभेच्छाही दिल्या  आहेत. 'होळी या सणानिमित्त सगळ्यांना खूप शुभेच्छा', तिनं शेअर केलेल्या ग्रुप फोटोमध्ये सगळेच आनंदात दिसत आहेत.   विक्की कौशलच्या बाजूला कतरिना कैफ दिसत आहे. तिच्यावर चेहऱ्यावर चमक आणि आनंद दिसत आहे. सनी कौशलच्या हातात पिचकारी दिसत आहे.  तर, कतरिनाची बहीण इसाबेल देखील आनंदात  दिसत आहे.  कतरिनाची बहीण इसाबेलनेही होळी साजरा करतानाचे फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. सध्या कतरिनाची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

विक्की आणि कतरिनाचं लग्न 9 डिसेंबर 2021 रोजी राजस्थान येथे पार पडले. दोघांच्या शाही सोहळ्यात अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होती.   120 पाहुण्यांमध्ये हा लग्न सोहळा पार पडला.  लग्नाच्या चार वर्षांनंतर, या जोडप्याला पुत्ररत्न प्राप्त झाला आहे. 7 नोव्हेंबर 2025 रोजी दोघांनी पोस्ट शेअर करुन  चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली.  विहान असे मुलाचे नाव ठेवण्यात आले आहे, असेही या कपलने जाहीर केले आहे.

Continues below advertisement

 

वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास, कतरिना शेवटी 2024 साली प्रदर्शित झालेल्या 'मेरी क्रिसमस' या चित्रपटात दिसली होती.  या चित्रपटात विजय सेतुपतिने मु्ख्य भूमिका साकारली होती. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची जादू फारशी चालली नाही. ओटीटीवर प्लॅटफॉर्मवरही या चित्रपटाला हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही.  दरम्यान, कतरिनाने अद्याप कोणत्याही नव्या प्रोजेक्टची घोषणा केलेली नाही.