Chanakya Niti : आपल्या कुटुंबात सुख, शांती, समृद्धी नांदावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. पण, अनेकदा आपल्या हातून अशा काही चुका घडतात ज्याचा फक्त आपल्यावरच नाही तर आपल्या कुटुंबियांवर देखील परिणाम होतो. यासाठी आचार्य चाणाक्य यांनी आपल्या नितीशास्त्रात (Chanakya Niti) अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या आजच्या काळातही आपल्याला उपयोगी पडू शकतात. या गोष्टी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

Continues below advertisement

काच तुटणे 

ज्योतिष शास्त्रानुसार, चाणक्य नितीमध्ये अशा काही गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे ज्या अगदी आजच्या काळातही उपयोगी पडतात. अशातच एक गोष्ट म्हणजे काचेचं तुटणे. एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा पण घराची काच तुटते तेव्हा हा एक प्रकारचा अशुभ संकेत आहे. चाणक्या नितीनुसार, हे आर्थिक तंगीचा संकेत आहे. यासाठी घरात कोणतंच तुटलेल्या काचेचं सामान ठेवू नये. यामुळे घरात नकारात्मक वातावरण निर्माण होतं. 

घरात सतत वाद-विवाद होत असल्यास 

आपल्या प्राचीन ग्रंथात अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला वेळेआधीच संकटाची चाहून देतात. जसे की, घरात वारंवार भांडणांचं वातावरण असेल तर याचा अर्थ तुमच्या घरात लक्ष्मी टिकत नाही. फक्त चाणक्य नितीतच नाही तर धार्मिक ग्रंथांतही याचा उल्लेख करण्यात आला आहे. जर घरात विनाकारण वाद होत असतील, घरातील सदस्या एकमेकांवर नाराज असतील तर तुमच्या घरावर आर्थिक संकट येण्याचे हे संकेत आहेत. 

Continues below advertisement

घरातील ज्येष्ठ सदस्यांचा अपमान करणे

चाणक्यांनुसार, ज्या घरात घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आदर होत नसेल. किंवा ते खुश नसतील तर हे येणाऱ्या आर्थिक संकटांचा संकेत आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद मिळणं म्हणजे त्या घराची प्रगती होणं. पण ज्या घरात मोठ्यांचा सन्मान होत नाही. त्या घरात देवी लक्ष्मी वास करत नाही. 

भक्तीत मन रमत नसेल तर...

ज्या घरात नियमितपणे पूजा-पाठ होत असेल त्या घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि घरातील वातावरण आनंदी राहते. पण, जर तुमचं मन पूजा-पाठमध्ये रमत नसेल तर त्या घरावर आर्थिक संकट राहतं. 

तुळशीचं रोपटं कोमेजत असेल तर...

तुळशीच्या रोपाचं सनातन धर्मात फार महत्त्व आहे. घराच्या अंगणात जर तुळशी टवटवीत असेल तर त्याहून चांगली गोष्ट नाही. पण, सुख-समृद्धीचं प्रतीक मानली जाणारी तुळस जर अचानक सुकली असेल तर हे आर्थिक तंगीचं एक कारण ठरु शकतं. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :      

Taurus Yearly Horoscope 2026 : पैसा, नोकरी आणि प्रसिद्धी..वृषभ राशीसाठी नवीन वर्ष सक्सेसफुल; वाचा करिअर, शिक्षण आणि आर्थिक स्थिती, वार्षिक राशीभविष्य