Katrina Kaif Net Worth : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) सध्या विकी कौशलसोबतच्या अफेअरमुळे (Vicky Kaushal) चर्चेत आहे. कतरिनाचा सूर्यवंशी हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटातील अक्षय कुमार आणि कतरिनाच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. कतरिना तिच्या अभिनयाने आणि बॉल्ड अंदाजाने प्रेक्षकांची मनं जिंकत असते. जाणून घेऊयात कतरिनाच्या उत्पन्नाबाबत...
कतरिनाचे वार्षिक उत्पन्न
कतरिनाचे वार्षिक उत्पन्न 224 कोटी रूपये आहे. एका रिपोर्टनुसार, कतरिना एका चित्रपटामध्ये काम करण्यासाठी जवळपास 11 करोड रूपये घेते. तसेच एका जाहिरातीमध्ये काम करण्यासाठी कतरिना 6 ते 7 कोटी रूपये मानधन घेते. कतरिनाने स्वत: चा 'के ब्यूटी' नावाचा मेक-अप ब्रँड देखील सुरू केला आहे. या ब्रँडच्या ब्यूटी प्रोडक्ट्सला अनेकांची पसंती मिळाली आहे. या ब्रँडच्या जाहिरातीचे दिग्दर्शन जोया अख्तरने केले होते. जाहिरातीमध्ये राजा कुमारी, सायना नेहवाल आणि कुशा कपिला यांनी काम केले होते. फोर्ब्स च्या 2019च्या रिपोर्टनुसार, कतरिना भारतातमध्ये सर्वांत जास्त कमाई करणारी 23 वी सेलिब्रिटी ठरली आहे.
कतरिनाच्या बार बार देखो,जग्गा जासूस आणि टायगर जिंदा है या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. कतरिना आणि विकी कौशलचा लवकरच विवाह सोहळा पार पडणार आहे अशी चर्चा आहे. एका रिपोर्टनुसार, विकी कौशल आणि कतरिना कैफ राजस्थानमधील सिक्स सेन्स फोर्ट बरवारा येथे लग्न करण्याचा प्लॅन केला आहे. 700 वर्ष जुन्या असणाऱ्या या किल्ल्यात त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. या किल्ल्यातला प्रति व्यक्ती एका रात्रीचा खर्च 90 हजार आहे. 7 डिसेंबर ते 9 डिसेंबर दरम्यान लग्नसोहळा पार पडणार आहे, असं म्हणले जात आहे.