लॉकडाऊन काळात जवळपास सहा महिने बंद असलेली सिनेमागृहं नक्की कधी सुरू होणार याबद्दल शंका आहे. महाराष्ट्रात अद्याप याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. पण सिनेमाघरं सुरू करण्याबाबत कर्नाटक सरकारने एक निर्णय घेतला आहे. येत्या 1 ऑक्टोबरपासून कर्नाटकातली सिनेमागृहं सुरू करण्यात येणार आहेत.


कर्नाटकातही थिएटर्स खुली व्हावीत याबद्दल मागणी होत होती. भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांच्यासोबत साऊथ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या लोकांनी काही दिवसांपूर्वी ऑनलाईन मिटिंगही केल्याचं कळतं. यानुसार आता कर्नाटक सरकारने थिएटर्स खुली करण्याबद्दल निर्णय घेतला आहे. आता ही थिएटर्स कशी सुरू होतील, याची नियमावली नेमकी काय असेल. कोणते नियम सिनेमागृह चालकांना आणि प्रेक्षकांना पाळावे लागणार आहेत, ते येत्या काळात सप्टेंबरमध्ये स्पष्ट होईल.


आधी मुंबईची पाकव्याप्त काश्मीरसोबत तुलना, आता पाकिस्तान असा उल्लेख; कंगनाकडून ट्वीटची मालिका सुरुच


याबद्दलची नवी नियमावली सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर केली जाईल. कर्नाटकात या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं आहे. याबद्दल कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रमुख डी.आर. कृष्णा यांनीही या बातमीला दुजोरा दिला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र थिएटर खुली करण्याचा निर्णय कघी घेणार असा प्रश्नही विचारला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून थिएटर्स सुरू करावीत अशी मागणी सातत्याने होते आहे. अनेक थिएटर्स या लॉकडाऊन काळात बंदही पडली. पाच महिने थांबल्यानंतर आता थिएटरमालकांचा धीर सुटू लागला आहे.


रियाच्या समर्थनार्थ बॉलिवूड कलाकार, अटकेच्या वेळी रियाच्या टी-शर्टवरील ओळी शेअर करत पाठिंबा


सिंगल स्क्रीन थिएटर्स आणि एक्झिबिटर्सचे अध्यक्ष नितीन दातार यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन थिएटर्स खुली करण्याबद्दल आणि थिएटर चालकांसाठी काही कर माफ करण्यापद्दल पत्र दिलं होतं. तर ठाण्यातल्या एकपडदा थिएटर चालकांनी एक दिवस प्रतिकात्मक आंदोलनही केलं होतं. त्यावेळी ठाण्यातले एकपडदा थिएटर चालक एकत्र आले होते.


महाराष्ट्रात बॉलिवूड आणि मराठी सिनेउद्योग असताना याच राज्यात थिएटर सुरू होण्याबद्दल कधी निर्णय घेणार असा प्रश्न अनेक एक पडदा थिएटर ओनर्स विचारू लागले आहेत. याबद्दल बोलताना नितीन दातार म्हणाले, 'आता इतर गोष्टींना खुलं व्हायला परवानगी मिळाली आहे. तर मग थिएटर्सनाही परवानगी द्यावी. आता केंद्र लवकरच निर्णय घेईल. त्यानंतर थिएटर्स खुली करायची की नाहीत हा निर्णय राज्य सरकारने घ्यायचा आहे. सरकार काय निर्णय घेतं याकडे आमचं लक्ष आहे.'


भाजप शासित राज्यांत थिएटर्स सुरू होणार
सिनेमागृहं खुली करण्याच्या चर्चांना वेग आला आहे. महाराष्ट्रात त्याबद्दल अद्याप निर्णय झाला नसला तरी भाजप शासित राज्यांमध्ये ही थिएटर्स खुली करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्या न्यायाने गुजरातमध्येही ही थिएटर्स लवकरच खुली होतील अशी चर्चा थिएटर मालकांमध्ये आहे. पण याबद्दल कोणीही अधिकृत बोलत नाही.


Kangana Ranaut | आज माझं घर तुटलं, उद्या तुमचा गर्व तुटेल, मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर कंगनाची टीका