Kareena Kapoor : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) ही सध्या तिच्या कुटुंबासोबत लंडन ट्रिप एन्जोय करत आहे. करीना ही पती सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि तैमुर, जेह या तिच्या मुलांसोबत लंडनमध्ये ट्रिपला गेली आहे. करीना सोशल मीडियावर लंडन ट्रिपचे फोटो शेअर करत आहे. करीना आणि सैफचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमुळे आता करीना ही तिसऱ्यांदा आई होणार आहे का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स
व्हायरल फोटो मध्ये करीना ही ब्लॅक कलरचा टँग टॉप, हातात कप आणि स्लिंग बॅग,न्यूड मेक-अप अशा लूकमध्ये करीना दिसत आहे. या फोटोमध्ये सैफ देखील दिसत आहे. या फोटोला कमेंट करुन एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'करीना प्रेग्नंट आहे का?' तर दुसऱ्या नेटकऱ्यानं कमेंट केली, 'करीना ब्लॅक आऊटफिटमध्ये तिची बेली लपवू शकली नाही. ' अनेकांनी करीनाला कमेंटमध्ये टॅग करुन ती प्रेग्नंट आहे का असा प्रश्न विचारला. पण हा व्हायरल फोटो करीना आणि सैफ यांच्या लंडन ट्रिपचा आहे? की जुना आहे? याबाबात अजून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. तसेच करीना आणि सैफ यांनी देखील करीनाच्या प्रेग्नन्सीबाबत माहिती दिलेली नाही.
करीना आणि सैफनं 2012 साली लग्नगाठ बांधली. 2016 साली तैमुरचा जन्म झाला. त्यानंतर 21 फेब्रुवारी 2021 रोजी जहांगिरचा जन्म झाला. 'जेह' हे जहांगिरचे टोपण नाव आहे.
करीनाचा आगामी चित्रपट
करीना कपूरचा लाल सिंह चढ्ढा हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. करीनासोबत अभिनेता आमिर खान हा या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. लाल सिंह चड्ढा हा चित्रपट फॉरेस्ट गंप या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. हॉलिवूडमधील फॉरेस्ट गंप या चित्रपटामध्ये अभिनेता टॉम हँक्स यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. लाल सिंह चड्ढा या चित्रपटात मोना सिंह आणि चैतन्य अक्किनेनी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
हेही वाचा: