Kareena Kapoor On Botox: शेफाली जरीवालाच्या (Shefali Jariwala) मृत्यूनं लोकांना धक्का बसला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ती अँटी-एजिंग ट्रीटमेंट घेत होती. तिच्या मृत्यूनंतर ही औषधं घ्यावीत की, नाही यावर जोरदार चर्चा झाली. दरम्यान, करीना कपूरचं वक्तव्य व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिनं म्हटलं आहे की, ती बोटॉक्सच्या विरोधात आहे.
बरखा दत्तला दिलेल्या मुलाखतीत बोलताना करिना कपूर (Kareena Kapoor) म्हणाली की, "मी बोटॉक्सच्या (Botox) विरोधात आहे. मी निरोगी राहण्यासाठी, चांगलं वाटण्यासाठी नैसर्गिक उपायांच्या आणि स्वसंरक्षणाच्या बाजूनं आहे. स्वसंरक्षण म्हणजे, स्वतःचं आणि तुमच्या प्रतिभेचं रक्षण करणं देखील... कारण हे माझे शस्त्र आहे."
मित्रमंडळी आणि कुटुंबासोबत वेळ घालवा : करिना कपूर
करिना कपूर म्हणाली होती की, "याचा अर्थ माझा स्वतःचा आणि माझ्या प्रतिभेचा बचाव करणं असा आहे, कारण ते माझं सर्वात मोठं शस्त्र आहे. सुई आणि चाकूखाली जाण्याऐवजी, स्वसंरक्षणाचा एक चांगला मार्ग म्हणजे, सुट्टी घेऊन तुमच्या मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत क्वालिटी टाईम घालवा."
लो बीपीमुळे शेफालीचा मृत्यू?
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री उशिरा शेफाली जरीवालाचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्याचं वृत्त आहे. सुरुवातीच्या अहवालात, "लो बीपी, हार्ट अटॅक आणि गॅस्ट्रिकमुळे" तिचा मृत्यू झाल्याचं म्हटलं असलं तरी, नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोस्टमार्टम रिपोर्ट लवकरच जारी केला जाण्याची शक्यता आहे.
अँटी-एजिंग ट्रिटमेंट घेत होती शेफाली
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या निधनानं संपूर्ण इंडस्ट्री हादरली आहे. शुक्रवारी रात्री उशीरा शेफालीचं हॉर्ट अटॅकनं निधन झालं. दरम्यान, अभिनेत्रीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट अद्याप समोर आलेला नाही. रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री गेल्या पाच वर्षांपासून अँटी-एजिंग ट्रीटमेंट घेत होती. ज्या दिवशी अभिनेत्रीचा मृत्यू झाला, त्याच दिवशी तिनं अँटी-एजिंग इंजेक्शन्स घेतली होती. पोलीस सध्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत. आतापर्यंत सुमारे 14 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :