Kareena Kapoor Khan : भारताच्या सिनेसृष्टीत सर्वात जास्त मेहनत घेणारे कलाकार आहेत. सध्याच्या युवा कलाकारांपेक्षा आम्ही जास्त मेहनत घेतली आहे. अभिनेत्री राणी मुखर्जी (Rani Mukerji) अभिनय करताना स्वत:ला पूर्णपणे झोकून देऊन काम करते. ती ज्या पात्रासाठी काम करते. ते पात्र व्यवस्थितपणे पडद्यावर उतरवते. तुम्ही तिला अजिबात दुर्लक्षित करु इच्छित नाहीत. राणी शिवाय अभिनेत्री तब्बूही बॉलिवूडमधील उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे. तब्बूला (Tabu) पाहाताना तिच्या वयाबाबत कोणीही विचार करत नाही. ती प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आली आहे. आम्ही देखील मनोरंजन करण्याचे काम करतो. त्यामुळे अभिनय करताना वय वाढलं तरी कुठे फरक पडतो, असे बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खान (Kareena Kapoor Khan) म्हणाली. एका मुलाखतीदरम्यान तिने राणी मुखर्जी आणि तब्बूचे तोंड भरुन कौतुक केले.

  


करीना कपूर (Kareena Kapoor Khan) म्हणाली, जुने कलाकार सध्याच्या कलाकारांपेक्षा जास्त काम करत आहेत. आम्ही सर्वजण उत्साहाने पुढे जात आहोत. वय हा फक्त आकडा आहे, त्यावर चर्चा झाली नाही पाहिजे. तुम्ही पुरुष कलाकारांच्या मागील पिढीला वयाबाबत विचारतात का? मग आमच्या वयाबाबत का बोलले जाते? असा सवालही तिने केला आहे. एखाद्या सिनेमाने बंप्पर कमाई केली तर त्याचे क्रेडीट पुरुष कलाकारांनाच दिले जाते. करीना कपूर 'गुड न्यूज' या चित्रपटात मुख्य भूमिकेत होती. गुड न्यूजमध्ये एका महिलेची गोष्ट सांगण्यात आली होती. या सिनेमात करिना कपूरने अक्षय कुमारच्या पत्नीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात तब्बल 318 कोटींची कमाई केली होती. 


 'जानेजा' नंतर पु्न्हा एका नेटफिल्क्सवर दिसणार करीना  


करीना आता नेटफिल्क्सवर देखील दिसणार आहे. 'बकिंघम मर्डर्स' हा तिचा पुढील सिनेमा आहे. नेटफ्लिक्सवर या चित्रपटातून क्राईम आणि थ्रिलर दाखवण्यात येणार आहे. याशिवाय 2024 मध्ये तिचे 2 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. करीना तब्बू, कृती सेनॉन, दिलजीत दोसांझ आणि कपिल शर्मा या कलाकारांसमवेत 'द क्रू' मध्ये दिसणार आहे. त्यानंतर अजय देवगनच्या सिंघम 3 मध्येही तिची प्रमुख भूमिका असेल. 


'जानेजा'मधील भूमिका चर्चेत 


सरत्या वर्षात करीनाचा जानेजा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज झाला होता. या चित्रपटातील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांनी तुफान पसंती दिली आहे. करीनाने आजवर अनेक हिट सिनेमे दिले आहेत. मात्र, जानेजाच्या माध्यमातून पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये चर्चेत आली होती. एका मुलाखतीत तिने विविध विषयांवर भाष्य केलं. जुने कलाकार किती मेहनती आहेत? पुरुषांना संपूर्ण क्रेडीट दिलं जात? अशा विविध मुद्यांवर तिने भाष्य केलं आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


Trisha Krishnan : 'खट्टा-मीठा'नंतर 13 वर्षांनी अभिनेत्री तृषा बॉलिवूडमध्ये परतणार, सलमानसोबत शेअर करणार स्क्रीन