Lock Upp : ‘बिग बॉस 15’पासून अभिनेता करण कुंद्रा (Karan Kundra) सतत चर्चेत आहे. करण कुंद्राला अनेक नव्या ऑफर्स मिळाल्या आहेत. सध्या करण कामच्या गडबडती प्रचंड व्यस्त आहे. अभिनेता दररोज नवीन प्रोजेक्टचा भाग बनत आहे. अशाचं वेळी आता त्याच्या एका नवीन शोचा प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये करण कुंद्रा पुन्हा एकदा आपली जादू दाखवताना दिसत आहे.


‘बिग बॉस’नंतर कंगना रनौतच्या ‘लॉक अप’ शोमध्ये करण कुंद्रा जेलरच्या भूमिकेत दिसला होता. तो स्पर्धकांना जोरदार बोल लगावताना देताना दिसला, पण नवीन शोचा प्रोमो आल्यानंतर करण ‘लॉक अप’ शोला बाय बाय करणार असल्याचं बोललं जात आहे.


वास्तविक, नुकताच ‘डान्स दिवाने ज्युनियर्स’चा नवीन प्रोमो रिलीज झाला आहे. प्रोमो व्हिडीओमध्ये करण कुंद्रा आणि कोरिओग्राफर मर्झी पेस्टोनजी धमाल करताना दिसत आहेत. करण आणि मर्झीसोबत अनेक मुलंही डान्स फ्लोअरवर थिरकताना दिसतात. ‘डान्स दिवाने ज्युनियर्स’चा प्रोमो व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.



‘डान्स दिवाने’ या शोच्या नवीन प्रोमो व्हिडीओमध्ये करण कुंद्रा म्हणताना दिसत आहे, यावेळी फक्त मुलांचा जोर राहील….


करण कुंद्रा त्याच्या प्रोफेशनल लाईफसोबतच पर्सनल लाईफबद्दलही खूप चर्चेत आहे. करण कुंद्रा आणि अभिनेत्री तेजस्वी प्रकाश यांच्या प्रेमकथेला बिग बॉसच्या घरातूनच चाहत्यांचे प्रेम मिळू लागले आहे. बिग बॉस संपल्यानंतरही तेजस्वी आणि करणला चाहत्यांकडून खूप प्रेम आणि आपुलकी मिळत आहे. करण आणि तेजस्वी सार्वजनिक आणि खास प्रसंगी एकत्र दिसण्याची एकही संधी सोडत नाहीत. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर सतत दोघांचाच बोलबाला असतो. 


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha