Karan Johar Transformation: सध्या बॉलिवूडचा (Bollywood Producer) प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) फिट आणि यंग दिसत आहे. वयाच्या 52 व्या वर्षीही करणनं तिशीतल्या व्यक्तीप्रमाणे आपला फिटनेस कायम ठेवला आहे. आपल्या फिटनेसमुळे करणनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पण, यामागचं रहस्य काय? याबाबत खुद्द करण जौहरनं खुलासा केला आहे. त्यानं केवळ त्याचं वजन कमी केलेलं नाही, तर त्यासाठी त्यानं जी पद्धत वापरली तीसुद्धा त्यानं सांगितली आहे.
बॉलिवूडच्या दिग्गज निर्मात्यांपैकी एक असणारा करण जोहर गेल्या काही काळापासून त्याच्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आहे. करण जोहरनं अचानक आपलं बरचंस वजन कमी केलं आणि त्यामुळे तो आता पूर्वीपेक्षा जास्त सुंदर दिसत आहे. अशातच आता त्याच्याकडे पाहून असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही की, 52 वर्षातही करण जोहर 32 वर्षांच्या माणसासारखा दिसतो. त्याचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं.
करण जोहरनं वयाची पन्नाशी ओलांडली आहे, पण या वयातही तो तरुण दिसत आहे. अशातच त्यानं अचानक त्याच्या चेहऱ्यावर परतलेल्या ग्लोबाबत भाष्य केलं आहे. 52 वर्षांच्या करणनं अवघ्या चार महिन्यांत 17 किलो वजन कमी केलं आहे. निरोगी आहार, योग आणि वर्कआउट्सद्वारे त्यानं फिटनेस मिळवल्याचं करणननं सांगितलं आहे.
करण जोहरनं कसं कमी केलं 17 किलो वजन?
करण जोहरनं आपल्या वेट लॉस जर्नीबाबत खुलासा केला आहे. आयफा 2025 साठी बॉलिवूडमधील अनेक मोठे स्टार जयपूरला पोहोचले होते. करणनंही आपली उपस्थिती जाणवू दिलेली नाही. या दरम्यान, ग्रीन कार्पेटवर माध्यमांशी बोलताना, त्यानं त्याच्या ट्रान्सफॉर्मेशनबाबत सांगितलं की, "हे सर्व योग्य आहार, योगाभ्यास, निरोगी राहणं आणि उत्तम दिसण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणं हे सगळं आहे. मी यामार्फतच स्वतःचं ट्रान्सफॉर्मेशन केलं आहे." अशातच ज्यावेळी त्याच्या एका रिपोर्टरनं त्याच्या डेली रुटीनबाबत विचारलं त्यावेळी त्यानं सांगितलं की, "जर मी तुम्हाला रुटीन सांगितलं, तर मग मी माझं सगळं सीक्रेटच सांगून टाकीन..."
करणवर ओजेम्पिक वापरल्याचा आरोप
करण जोहरवर ओजेम्पिक (वजन कमी करणारं औषध) वापरल्याचा आरोप होत होते. 2024 मध्ये, नेटफ्लिक्स शो 'फॅब्युलस लाईव्हज ऑफ बॉलिवूड वाईव्हज' मध्ये, अभिनेता संजय कपूरची पत्नी महीप कपूर यांनी ओजेम्पिक सारख्या औषधाचा उल्लेख केला. यानंतर लोकांनी करण जोहरवर आरोप केले. लोकांचा असा विश्वास होता की, करण देखील वजन कमी करण्यासाठी हे औषध वापरत असल्याचा आरोप करण्यात आला. पण आता करणनं स्वतः या अफवांना फेटाळून लावलं आहे आणि म्हटलं आहे की, त्यानं निरोगी आहार आणि चांगल्या दिनचर्येच्या जोरावर त्याचं वजन कमी केलं आहे.