Karan Johar :  संपूर्ण देशभरात होळी आणि धुळवडीचा उत्साह पाहायला मिळतोय. आपले लाडके कलाकारही या होळीच्या रंगात अगदी न्हाऊन जातात. पण काही असे कलाकारही आहेत, जे रंगांपासून कायम लांबच राहतात. दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता करण जौहर (Karan Johar) हा देखील त्यांच्याचमधील एक आहे. करण लहानपणी आपल्या परिवारासह आणि मित्रांसोबत आनंदाने होळी खेळायचा. पण त्यानंतर असं काही झालं ज्यामुळे करणने होळी खेळणं बंद केलं. याला कारण ठरलं ते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची एक पार्टी. 


करण जौहर प्रत्येक सण हा आनंदाने साजरा करतो. करण जौहरची पार्टी ही बी टाऊनमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. पण करण फक्त एका होळी या सणापासून लांब राहतो. इंडियाच नेक्ट सुपरस्टार्स या कार्यक्रमात करणने 2018 मध्ये याबाबत खुलासा केला होता. तसेच यावेळी करणने त्याला होळी खेळायला अजिबात आवडत नसून त्याचं अभिषेक बच्चन कारण ठरल्याचं त्याने सांगितलं. 


नेमकं काय घडलं होतं?


करण जौहरने सांगतिलं की जेव्हा तो 10 वर्षांचा होता तेव्हा अमिताभ बच्चन यांच्या घरी होळी खेळण्यासाठी गेला होता. तेव्हा बिग बींच्या घरी अनेक सेलिब्रिटी होते. करण जौहर देखील या पार्टीमध्ये होता. करण जौहरने सांगितलं की त्याला लहानपणापासूनच होळीचा रंग खेळण्याची फारशी आवड नव्हती. तो या सगळ्यापासून दूरच राहायचा. जेव्हा तो अमिताभ यांच्या घरी पोहचला तेव्हा त्याने सगळ्यांना सांगितलं की त्याला रंग खेळायला फरासं आवडत नाही. पण अभिषेकला हे सांगायच्या आतच त्याने करणला पूलमध्ये टाकलं आणि त्याच्यावर रंगही टाकले. तेव्हापासून करण जौहरने होळी खेळणं सोडून दिलं. 


अमिताभ यांच्या होळी पार्टीमध्ये व्हायच्या या गोष्टी


अमिताभ बच्चन यांची होळी पार्टी ही बॉलीवूडमधली सर्वात आघाडीची होळी पार्टी असल्याचं म्हटलं जायचं. राज कपूर यांची आरके स्टुडिओमधली आणि दुसरी अमिताभ यांची होळी पार्टी ही सर्वात जास्त प्रसिद्ध होती. अमिताभ बच्चन यांच्या घरी जो कोणी यायचा त्याला संपूर्ण बच्चन परिवार रंगाच्या पाण्यात टाकून स्वागत करायचे. खूप थंडाई पिली जायची आणि बरच नाच गाणंही व्हायचं. त्यामुळे अमिताभ बच्चन यांच्या घरची ही पार्टी विशेष प्रसिद्ध होती. 


ही बातमी वाचा :


Kangana Ranaut : 'देशाला गरज असेल तर निवडणूक लढवणार', 10 महिन्यापूर्वीच कंगनाचे 'माझा कट्टा'वर निवडणूक लढवण्याचे संकेत!