Karan Johar : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माता करण जोहरच्या (Karan Johar) चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. करणच्या कुछ कुछ होता है (Kuch Kuch Hota Hai) या चित्रपटानं प्रेक्षकांची विशेष पसंती मिळवली. एका मुलाखतीमध्ये या चित्रपटाच्या रिमेकबाबत सांगितलं. करणनं या रिमेकमधील स्टार कास्टबाबत देखील सांगितलं. 


काय म्हणाला करण?
1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या कुछ कुछ होता है या चित्रपटाचे दिग्दर्शन करणनं केलं होतं. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटाचा रिमेक होणार का असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे? या मुलाखतीमध्ये हाच प्रश्न करणला विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देत करण म्हणाला, 'जर कुछ कुछ होता है चा रिमेक करायचं मी ठरवलं तर या चित्रपटामध्ये अंजली, राहुल आणि टीना यांची भूमिका आलिया भट्ट, रणवीर सिंह आणि जान्हवी कपूर हे कलाकार साकारतील.'


प्रसिद्ध कलाकारांनी कुछ कुछ होता है मध्ये केलं काम


कुछ कुछ होता है या चित्रपटामध्ये शाहरुख खान, काजोल आणि रानी मुखर्जी या कलाकरांनी प्रमुख भूमिका साकारली. तसेच अभिनेता सलमान खाननं या चित्रपटात साइड रोल केला. कुछ कुछ होता है या चित्रपटामधील गाण्यांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. 


करणचे हिट चित्रपट


करणनं  'दिलवाले दुल्हिनयां ले जाएंगे' या चित्रपटामधून बॉलिवूडमधील करिअरला सुरूवात केली. या चित्रपटाचा तो असिस्टंट डायरेक्टर होता. त्यानंतर करणनं  'कुछ कुछ होता है'  चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाला सात फिल्मफेअर पुरस्कार मिळाले होते.  'कभी खुशी कभी गम,' 'कभी अलविदा न कहना,' 'माइ नेम इज खान,' स्टूडेंट ऑफ द इयर,' 'ऐ दिल है मुश्किल' आणि 'लस्ट स्टोरीज' या हिट चित्रपटांची निर्मिती करणनं केली. करण जोहरचा जुग जुग जियो हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. जुग जुग जियो या चित्रपटामध्ये कियारा आडवाणी आणि वरुण धवन यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.


हेही वाचा:


Karan Johar's 50th Birthday : करण जोहरचा 50 वा वाढदिवस; DDLJ नं करिअरला सुरूवात, आज कोट्यवधींचा मालक