Mohan Bhagwats Sense of Humour Impresses Filmmaker Karan Johar: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण झाली. या खास दिनाचे औचित्य साधत संघाकडून मुंबईच्या नेहरू सेंटर येथे भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नवे क्षितिज या दोन दिवस व्याख्यानमालेमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी उपस्थितांना संबोधित केले.  या कार्यक्रमात राजकारणी, खेळाडू आणि कलाकारांनीही हजेरी लावली. विशेष म्हणजे या कार्यक्रमात सुपरस्टार सलमान खानची उपस्थिती लक्षवेधी ठरली. या खास सोहळ्यात लोकप्रिय चित्रपट दिग्दर्शक करण जोहर यानेही हजेरी लावली.  प्रसार माध्यमांशी बोलताना करण जोहरने मोहन भागवत यांच्या व्यक्तिमत्वाचं कौतुक केलं. 'त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर थक्क करणारा आहे', असं म्हणत करणने मोहन भागवत यांची प्रशंसा केली. 

Continues below advertisement

व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी अनेक कलाकारांनी उपस्थिती दर्शवली. मराठी कलाकारही होते.  या कार्यक्रमात दिग्दर्शक करण जोहरही सहभागी झाला होता. या व्याख्यानमालेत  त्याने हजेरी लावली होती. कार्यक्रम संपल्यानंतर करण जोहरने प्रसारमाध्यमांसमोर मोहन भागवत यांचं कौतुक केलं. करण म्हणाला, "आरएसएसच्या 100 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित व्याख्यानमालेला उपस्थित राहून खूप  आनंद झाला.  मोहन भागवत यांनी वेळ काढून विचार मांडले, याबद्दल मी त्यांचे आभारी आहे.  त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं. मी मनापासून प्रभावित झालो आहे", असं करण म्हणाला.

 

Continues below advertisement

"मोहन भागवत यांचा सेन्स ऑफ ह्युमर खूप भन्नाट आहे. त्यांचं म्हणणं ऐकत असताना आम्ही खूप हसलो. असे कार्यक्रम खरंतर दरवर्षी व्हायला हवे आहेत", अशी इच्छा करण जोहरने व्यक्त केली.  यावेळी त्यानं मोहन भागवत यांच्या व्यक्तिमत्वाचे कौतुक केल्याचे पाहायला मिळालं.

आरएसएसच्या दोन दिवसीय कार्यक्रमात कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली.  सलमान खान, रणबीर कपूर, अनन्या पांडे, शिल्पा शेट्टी, रवीना टंडन, महेश मांजरेकर,  प्रसाद ओक आणि सुनील बर्वे यांची उपस्थिती पाहायला मिळाली. तसेच इतर कलाकारही उपस्थित होते.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'धुरंधर 2' रिलीज होण्यापूर्वीच OTT वर येण्याच्या चर्चा; पण, Netflix पाहता येणार नाही, मग थिएटरनंतर कुठे रिलीज होणार?

'मी काय करावं? माझ्याकडे पैसेच नाहीत...', तिहार तुरुंगात सरेंडर केलेला राजपाल यादव भावूक; अभिनेत्याच्या अडचणी संपेचना