Kapil Sharma: कॉमेडियन अभिनेता कपिल शर्मा लवकरच 'किस किस को प्यार करू 2' या चित्रपटातून समोर येणार आहे. त्याच्या फिल्मचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलर लॉन्च च्या कार्यक्रमात कपिलने त्याच्या कॅनडातील सरे (Surrey) शहरात असलेल्या त्याच्या ‘कॅप्स कॅफे’वर झालेल्या तीन फायरिंग प्रकरणांवर वक्तव्य केले आहे. या घटनांमुळे कॅफेला उलट मोठी ओपनिंग मिळाली आणि स्थानिक लोकांचा पाठिंबाही वाढल्याचं कपिल म्हणाला. कपिल त्याच्या आगामी चित्रपट ‘किस किसको प्यार करूं 2’ च्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात बोलत होता. जुलै, ऑगस्ट आणि ऑक्टोबर अशा तीन महिन्यांत त्याच्या कॅफेवर गोळीबार झाल्याची प्रकरणे समोर आली होती.
“घटना घडल्या, पण फायदही झाला”
कपिल शर्मा म्हणाला, “नियम तर आहेत, पण स्थानिक पोलिसांकडे कदाचित नियंत्रण करण्याचे पुरेसे अधिकार नाहीत. आमच्या प्रकरणानंतर मात्र, विषय थेट फेडरल सरकारपर्यंत गेला आणि कॅनडा संसदेतही चर्चा झाली. या घटनेनंतर लोकांनी खूप साथ दिली. या प्रत्येक घटनेनंतर आमच्या कॅफेला मोठी ओपनिंग मिळाली. देव माझ्यासोबत आहे त्यामुळे मला काही काळजी नाही.”
कपिलच्या मते, या हल्ल्यांमुळे सरेच्या परिसरात कायदा-सुव्यवस्थेच्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले. तो पुढे म्हणाला ,“देव जे काही करतो त्यामागचे कारण आपल्याला लगेच कळत नाही. अनेक लोकांनी मला फोन करून सांगितले की सरेमध्ये बऱ्याच समस्या सुरु होत्या. पण माझ्या कॅफेवर फायरिंग झाल्यानंतर या बातमीने मोठं रूप घेतलं आणि आता परिस्थिती सुधारण्यासाठी पावलं उचलली जात आहेत.” कपिलनी शेवटी सांगितलं,“मला माझ्या देशात, विशेषत: मुंबईत, कधीही असुरक्षित वाटलं नाही.” कॅनडातील सरी येथील कॅप्स कॅफेवर पहिला हल्ला जुलैमध्ये झाला होता त्यानंतर दुसरा ऑगस्ट आणि तिसरा ऑक्टोबरमध्ये झाला होता.
कपिलचा नवा चित्रपट लवकरच
कपिल शर्मा यांच्या ‘किस किसको प्यार करूं 2’ चे दिग्दर्शन अनुकल्प गोस्वामी यांनी केले असून, चित्रपटात तृप्ती डिमरी, शनाया कपूर, तरुण गहलोत आणि रवी किशन हे कलाकारही झळकणार आहेत. या सिनेमात कपिल पुन्हा एकदा तीन अभिनेत्रींसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. ट्रेलरमध्ये तो प्रेमाच्या शोधात आहे असं दाखवण्यात आलंय आणि त्तोयासाठी तो हिंदू धर्मातून इस्लाम धर्मात आणि नंतर इस्लाममधून ख्रिश्चन धर्मात जातो. यात त्याला तीन सुंदर स्त्रिया मिळाल्या आहेत. हलकीफुलकी कॉमेडी या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.