Malkapur बुलढाणा : राज्यातसध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे (Maharashtra Local Body Election 2025) वारेवाहतआहे. या पार्श्वभूमीवरस्थानिक कार्यकर्त्यांपासूनतेउच्चपदस्थनेतेहीनिवडणुकांच्या प्रचारातव्यक्तअसल्याचेदिसतआहे. अशातच काल मलकापूर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. मात्रयासभेसंदर्भातएकधक्कादायकप्रकारसमोरआलाआहे. या सभेला हजर राहण्यासाठी चक्क शासकीय सेवेत असलेल्या आशा गटप्रवर्तकानेच तालुक्यातील आशा व अंगणवाडी सेविकांना या प्रचार सभेला हजर राहण्याचे आदेश दिल्याचीमाहितीआतासमोरआलीय. व्हाट्सअपवरून हाआदेशपाठवण्यात आल्याचीमाहितीआहे. दरम्यान, अजितदादांच्या या सभेला अनेक आशा व अंगणवाडी सेविका हजर राहिल्यात आणि त्याही चक्क गणवेशात. त्यामुळेसर्वत्रचर्चेलाउधानआलंआहे.
गटप्रवर्तकाकडून व्हाट्सअपद्वारे संदेश; निवडणूक आयोगाकडून अद्याप कारवाई नाही
दुसरीकडे याबाबत आशा वर्कर व अंगणवाडी सेविकांना माध्यमांनी विचारलं असता त्यांनी आम्हालाच आमच्या गटप्रवर्तकाने व्हाट्सअपद्वारे संदेश देऊन अजित दादांच्या प्रचार सभेला हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आम्ही या प्रचार सभेला हजर आहोत, असं सांगितलं. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. मात्र अद्याप निवडणूक विभागाकडून या शासकीय कर्मचाऱ्यांवर किंवा गटप्रवर्तकावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे निवडणूक आचारसंहितेचा हा भंग मानला जात असल्याने आश्चर्य वाटत आहे.
आयटी हिंजवडीत धक्कादायक घटना घडलीये. वीस लहानग्यांना अंगणवाडीत कोंडून ठेवल्याच्या प्रताप समोर आलाय. एबीपी माझाच्या हाती लागलेल्या व्हिडिओत मुलं अक्षरशः रडत असल्याचं दिसून येतंय. हे पाहून पालकांनी चांगलाच संताप व्यक्त केला. हिंजवडीतील अंगणवाडी क्रमांक तीनच्या सेविका सविता शिंदे आणि मदतनीस शिल्पा साखरे यांनी हा प्रताप केलाय. ग्रामपंचायतीत एका माजी सरपंचाने बैठकीला बोलावलं म्हणून आम्ही मुलांना आत ठेवून अंगवाडीला कुलूप लावला. असा खुलासा या दोघींनी केलाय. काल दुपारी 11 ते 12 च्या दरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला. उपस्थितांनी ही बाब मुळशी पंचायत समितीचे बाल विकास प्रकल्प अधिकारी धनराज गिराम यांना कल्पना दिली, तेंव्हा गिराम यांनी शिंदे आणि साखरे या दोघींना बैठक सोडून तातडीनं अंगणवाडीचं कुलूप खोलण्याचे आदेश दिले. काही वेळासाठी का असेना असं लहानग्यांना अंगणवाडीत कोंडून जाणं, हे किती धोकादायक आणि संतापजनक आहे. हे व्हिडिओतील मुलांच्या आक्रोशावरून स्पष्ट होतंय. आता बाल विकास प्रकल्प अधिकारी काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचे असेल.
आणखी वाचा
