Kantara Chapter 1 Box Office Collection: साऊथ सुपरस्टार (South Superstar) ऋषभ शेट्टीचा (Rishab Shetty) 'कांतारा : चॅप्टर 1' (Kantara Chapter 1) हा सिनेमा पैसे कमावण्याचं यंत्र बनला आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर (Box Office) धमाकेदार कमाई करत असल्याचं पाहायला मिळतंय. रिलीज झाल्या झाल्या पहिल्या तीन दिवसांतच देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर या सिनेमानं आपले पाय घट्ट रोवले आहेत. 'कांतारा : चॅप्टर 1'नं चौथ्या दिवशीही बंपर कलेक्शन केलंय. यासह सिनेमानं 200 कोटींच्या क्लबमध्ये थाटात एन्ट्री घेतली आहे. तसेच, चार सिनेमांचा विक्रमही मोडला आहे. ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा : चॅप्टर 1'नं चार दिवसांत भारतात किती कोटी रुपयांची कमाई केली, ते सविस्तर जाणून घेऊयात...
'कांतारा : चॅप्टर 1'नं पहिल्या तीन दिवसांत भारतीय बॉक्स ऑफिसवर निव्वळ 162.85 कोटी रुपये कमावलेत. शनिवारी, सिनेमानं 55 कोटींची कमाई केली, जी शुक्रवारच्या 46 कोटींच्या कमाईच्या तुलनेत जवळपास 20 टक्क्यांनी अधिक होती. रविवारी फिल्मच्या कमाईचा वेग आणखी वाढला.
'कांतारा : चॅप्टर 1'नं 200 कोटींचा टप्पा ओलांडला
ट्रेड वेबसाइट सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'कांतारा : चॅप्टर 1'नं रविवारी 61 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं आहे. ज्यामुळे त्यांचा ओपनिंग विकेंड 223.25 कोटींपर्यंत पोहोचला आहे. या अॅक्शन ड्रामा फिल्मनं संपूर्ण भारतात थिएटर हाऊसफुल्ल केले आहेत. रविवारी, विशेषतः कर्नाटकातील अनेक भागांमध्ये, कन्नड वर्जनने दुपार आणि संध्याकाळच्या शोसाठी 98-99 टक्क्यांचा प्रभावी ऑक्युपन्सी नोंदवली. परदेशात, 'कांतारा : चॅप्टर 1'नं देखील चांगली कामगिरी केली, पहिल्या तीन दिवसांत मिलियन डॉलरपेक्षा जास्त कमाई केली.
'कांतारा : चॅप्टर 1'नं मोडले चार सिनेमांचे रेकॉर्ड्स
रविवारी 'कांतारा : चॅप्टर 1'नं कमाईच्या बाबतीत अनेक प्रमुख चित्रपटांना मागे टाकलंय, ज्यात 'सितारे जमीन पर' (167 कोटी), 'दे कॉल हिम ओजी' (179 कोटी) आणि 'लोका चॅप्टर 1' (153 कोटी) यांचा समावेश आहे. 'कांतारा चॅप्टर 1'नं 'केजीएफ: चॅप्टर 1' (185 कोटी)च्या देशांतर्गत कमाईलाही मागे टाकलंय. यासह, 'कांतारा: चॅप्टर 1' हा भारतातील आतापर्यंतचा तिसरा सर्वाधिक कमाई करणारा कन्नड चित्रपट बनला आहे. पहिला 'केजीएफ: चॅप्टर 2' (860 कोटी) आणि दुसरा 'कांतारा' (310 कोटी) आहे.
ऋषभ शेट्टीनं केलंय फिल्मचं दिग्दर्शन
'कांतारा : चॅप्टर 1' हा 2022 मध्ये आलेल्या 'कांतारा' चित्रपटाचा प्रीक्वल आहे, जो ऋषभ शेट्टी यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट पहिल्या चित्रपटाच्या घटनांपूर्वीच्या हजार वर्षांपूर्वी घडतो. ऋषभ शेट्टी व्यतिरिक्त, रुक्मिणी वसंत, जयराम आणि गुलशन देवैया देखील महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :