Abhishek Bachchan Told his Childhood Incidence: बॉलिवूडचा (Bollywood News) शांत हिरो कोण? असं विचारलं तर, त्या यादीत अभिषेक बच्चनच्या (Abhishek Bachchan) नावाचा आवर्जुन समावेश केला जातो. संपूर्ण इंडस्ट्रीत आपला शांत स्वभाव, अत्यंत सोज्वळ आणि साधेपणासाठी ओळखला जाणारा बॉलिवूडचा स्टार (Bollywood Celebrity) म्हणजे, अभिषेक बच्चन. आई आणि वडील सुपरस्टार असल्यामुळे अभिषेकनं लहानपणापासून सिनेसृष्टी अगदी जवळून पाहिली आहे. अगदी लहानवयातच सेटवर जाणं, तिथल्या हिरो-हिरोईन्ससोबत बोलणं, त्यांच्या संपर्कात असणं, मोठमोठ्या पार्ट्या अटेंड करणं यांसारख्या गोष्टी त्यानं अगदी लहान वयातच केल्यात. मोठा झाल्यावर अभिषेकनं इंडस्ट्रीत डेब्यू केला, तेव्हा त्याचं नाव राणी मुखर्जी आणि करिश्मा कपूरसारख्या बड्या अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं. पण, त्यानं कधीच जाहीरपणे याबाबत वक्तव्य केलेलं नाही. त्यानंतर त्यानं ऐश्वर्या रायसोबत आपली लग्नगाठ बांधली आणि संसार थाटला. पण, राणी मुखर्जी, करिष्मा कपूर आणि ऐश्वर्या राय यांच्याहीपेक्षा जास्त अभिषेकचं दुसऱ्याच अभिनेत्रीवर प्रेम होतं. तिच्या सौंदर्यावर अभिषेक फार पू्र्वीच भाळला होता.
ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल ना? पण, तुम्हाला माहितीय का? अभिषेक बच्चन त्या अभिनेत्रीच्या प्रेमात आकंठ बुडालेला. त्यानं एकदा तर त्या अभिनेत्रीला थेट, "मी तुझ्यासोबत झोपू शकतो का...?", असं विचारलेलं. आणि यावर या दिग्गज अभिनेत्रीनं दिलेलं उत्तरही आश्चर्यकारक होतं.
अभिषेक बच्चननं स्वतः केलेला खुलासा
आपल्या पहिल्या प्रेमाबाबत अभिषेक बच्चननं स्वतः खुलासा केलेला. अभिषेक बच्चनने 'यारों की बारात' या टेलिव्हिजन शोमध्ये खुलासा केलेला. अभिनेत्यानं स्पष्ट केलेलं की, 1983 च्या 'महान' सिनेमाचं शुटिंग काठमांडूमध्ये सुरू होतं. त्यावेळी तो लहान होता आणि तो तिथेही गेलेला. सर्व सुपरस्टार्सच्या गराड्यात चिमुकला अभिषेक बागडत होता. मोठ्यांच्या गप्पा गोष्टी कान देऊन ऐकत होता. अशातच एक दिवस शुटिंग संपलं आणि सगळे एका रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी गेले आणि नंतर आपापल्या खोल्यांमध्ये जाऊ लागले.
अभिषेक बच्चननं सांगितलं की, "त्या सिनेमात दिग्गज अभिनेत्री झिनत अमान होत्या आणि त्या माझं पहिलं प्रेम होत्या... जेव्हा सर्वजण झोपायला जात होते, तेव्हा त्यासुद्धा उठल्या आणि त्यांच्या खोलीच्या दिशेनं जाऊ लागल्या. त्यावेळी मी त्यांना थांबवून विचारलं की, 'आंटी झीनत, तुम्ही कुठे जाताय?' त्या म्हणाल्या, 'मी माझ्या खोलीत जातेय...' मग मी म्हणालो, 'तुम्ही का जाताय...?' त्या म्हणाल्या, 'मी झोपायला जातेय...' मग मी विचारलं की, 'तुम्ही एकट्याच झोपता का?"
पुढे बोलताना अभिषेक म्हणाला की, "आम्ही लहान होतो, त्यामुळे आम्हाला एकटं झोपण्याची सवय नव्हती आणि आम्हाला एकटं झोपण्याची कल्पनाही नव्हती... त्या म्हणालेल्या, 'हो, मी एकटीच झोपते..." झीनत अमानने हे सांगताच मी लगेच म्हणालो, 'मी तुमच्यासोबत झोपू शकतो का?"
"आधी मोठा हो, मग माझ्यासोबत झोप..."
अभिषेक बच्चनचा प्रश्न ऐकून झिनत अमान यासुद्धा शांत बसल्या नाहीत. त्या म्हणाल्या, "आधी थोडा मोठा हो... मग झोप माझ्यासोबत..." ज्युनिअर बच्चनने सांगितलेला किस्सा ऐकून त्याच्यासोबत शोमध्ये उपस्थित असलेले संजय दत्त, अजय देवगन, रितेश देशमुख आणि साजिद खान पोट धरुन हसू लागले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :