Kantara Chapter 1 Advance Booking: ऋषभ शेट्टीचा (Rishab Shetty) बहुचर्चित चित्रपट 'कांतारा चॅप्टर 1' (Kantara Chapter 1) सोशल मीडियावर ट्रेंड करतोय. ट्रेलर प्रभावी आणि दमदार होता. ट्रेलर पाहिल्यापासून प्रेक्षक मोठ्या पडद्यावर त्याच्या रिलीजची आतुरतेनं वाट पाहत आहेत. ऋषभ शेट्टीचा बहुप्रतिक्षित सिनेमा 2 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. फक्त दोन दिवस शिल्लक आहेत. अशातच सिनेमानं अॅडव्हान्स बुकिंगमध्ये बाजी मारली आहे. अॅडव्हान्स बुकिंगमध्ये चित्रपटानं किती कोटी रुपये कमावलेत?
ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा चॅप्टर 1'नं जोरदार चर्चा रंगलीय. ज्यामुळे अॅडव्हान्स बुकिंगमध्ये वाढ झाली आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यास फक्त एक दिवस शिल्लक असताना, या चित्रपटानं अनेक मोठ्या चित्रपटांनी रचलेले रेकॉर्ड आधीच मोडले आहेत. 'कांतारा चॅप्टर 1'नं अॅडव्हान्स बुकिंगमध्ये कोट्यवधींची कमाई केली आहे.
ऋषभ शेट्टी सध्या 'कांतारा चॅप्टर 1'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. साऊथपासून अगदी नॉर्थपर्यंत, प्रत्येकजण 'कांतारा चॅप्टर 1'बद्दल बोलतोय. त्याचाच परिणाम, अॅडव्हान्स बुकिंगमध्ये दिसतोय. अॅडव्हान्स बुकिंगमध्ये 'कांतारा चॅप्टर 1'नं मोठी कमाई केली आहे.
'बागी 3', 'जॉली एलएलबी 3' आणि 'जाट'च्या रेकॉर्ड्सचा चक्काचूर
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'कांतारा चॅप्टर 1'नं अॅडव्हान्स बुकिंगनं 17.62 कोटींची कमाई केली आहे. ब्लॉक सीट्ससह, चित्रपटानं आतापर्यंत 3.71 लाख तिकिटं विकलीत. 2 ऑक्टोबरच्या सुट्टीमुळे 'कांतारा चॅप्टर 1'ला मोठा फायदा होणार आहे.
'कांतारा चॅप्टर 1'नं अॅडव्हान्स बुकिंगपूर्वीच अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. याने 'जॉली एलएलबी 3' (12.5 कोटी), 'बागी 4' (13.2 कोटी), 'जाट' (9.62 कोटी) आणि 'स्काय फोर्स' (15.30 कोटी) यांसारख्या चित्रपटांचे रेकॉर्ड मागे टाकले आहेत. 'कांतारा चॅप्टर 1' रिलीज होण्यापूर्वीच चर्चेत आला आहे.
दरम्यान, 'कांतारा चॅप्टर 1'बद्दल बोलायचं झालं तर, हा चित्रपट ऋषभ शेट्टी यांनी दिग्दर्शित केला आहे आणि तो देखील यात मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटात अनेक नवे कलाकार देखील सामील झाले आहेत. अॅडव्हान्स बुकिंगवरुन सिनेमाचं पहिल्या दिवसाचं कलेक्शन जबरदस्त असणार यात काही शंकाच नाही.