Kantara Box Office Collection Day 8: 2022 च्या ब्लॉकबस्टर 'कांतारा'चा (Kantara) सिक्वेल बनवण्यासाठी ऋषभ शेट्टीनं (Rishab Shetty) तीन वर्षे घालवली. 2022 नंतर दुसरा भाग 2 ऑक्टोबर 2025 रोजी प्रदर्शित झाला. लोकांना या चित्रपटातून खरोखर काहीतरी खास मिळेल अशी अपेक्षा होती आणि ती प्रत्यक्षात आली.

Continues below advertisement

'कांतारा चॅप्टर 1'मध्ये 5,000 वर्षांहून अधिक काळाच्या आणि जवळजवळ विसरलेल्या दंतकथांवर आधारित एक अनोखी कथा होती. दरम्यान, ऋषभ शेट्टीच्या चित्रपटानं स्थानिक प्रामाणिकपणाला प्राधान्य दिलं, देशभरातील आजींच्या लोककथांमध्ये हरवलेली एक उल्लेखनीय कथा घेतली आणि बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली.

म्हणूनच 'कांतारा'चं कलेक्शन सातत्यानं वाढतंय. आतापर्यंत चित्रपटांच्या कलेक्शनवर एक नजर टाकली. तसेच, आठव्या दिवशी चित्रपटानं कितीचा गल्ला केला? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

Continues below advertisement

'कांतारा चॅप्टर 1'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन

ऋषभ शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटानं गेल्या आठ दिवसांत दररोज धमाकेदार कमाई केली आहे. खाली देण्यात आलेला डेटा स्ट्रीमलिंकवर आधारित आहे आणि गुरुवारी सकाळी 10:45 वाजेपर्यंतचा आहे.                                

दिवस बॉक्स ऑफिस कलेक्शन (कोट्यवधींमध्ये)
दिवस 1 61.85 कोटी
दिवस 2 45.4 कोटी
दिवस 3 55 कोटी
दिवस 4 63 कोटी
दिवस 5 31.5 कोटी
दिवस 6 34.25 कोटी
दिवस 7 25.25 कोटी
दिवस 8 20.50 कोटी
एकूण 334.94 कोटी

'कांतारा चॅप्टर 1'नं मोडला 'सैयारा'चा विक्रम 

यावर्षी प्रदर्शित झालेला 'सैयारा' हा चित्रपट केवळ बॉलिवूडचाच नाही तर भारतीय चित्रपटसृष्टीतील 2025 चा सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला. 'छावा'नंतर (601.54 कोटी) हा चित्रपट दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरलाय. अहान पांडे आणि अनित पद्ढा यांच्या चित्रपटानं भारतीय बॉक्स ऑफिसवर 329.2 कोटी आणि जगभरात 569.75 कोटी कमावले. आता, 'कांतारा चॅप्टर 1'नं भारतीय बॉक्स ऑफिसवर 'कांतारा'ला खूप मागे टाकलंय. दरम्यान,'सैयारा'ला 300 कोटी रुपयांचा बॉक्स ऑफिस हिट होण्यासाठी 46 दिवस लागलेले, तर 'कांतारा चॅप्टर 1'नं हा टप्पा फक्त 8 दिवसांत गाठलाय, असं सायफायनं म्हटलं आहे.

'कांतारा चॅप्टर 1'नं वर्ल्डवाईड किती कमावले?

कोइमोई यांच्या मते, 'कांतारा चॅप्टर 1' हा चित्रपट 125 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता आणि या सिनेमानं फक्त 7 दिवसांत जगभरात 446 कोटी रुपयांची कमाई केली आहे.