Kangana Ranaut : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ही 'कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन' म्हणून ओळखली जाते. कंगना वेगवेगळ्या विषयांवर तिची मतं मांडते. तिनं केलेली वक्तव्य चर्चेत असतात. कंगनाच्या लव्ह लाईफची चर्चा देखील सोशल मीडियावर होत असते. तिचा चाहता वर्ग मोठा आहे. कंगनाचे चाहते तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठी नेहमी उत्सुक असतात. कंगना लग्न कधी करणार? असा प्रश्न आता चाहत्यांना पडला आहे. या प्रश्नाला कंगनानं आता उत्तर दिलं आहे. तिच्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधलं. 

Continues below advertisement


कंगनानं एका मुलाखतीमध्ये सांगितलं, 'माझं लग्न होत नाहीये कारण लोक माझ्याबद्दल अफवा पसरवत आहेत. लोक म्हणतात की मी खूप भांडते. लोकांमध्ये अशी चर्चा आहे की, मी मुलांना मारते. ' सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीमध्ये कंगनाला प्रश्न विचारण्यात आला की, 'तुझ्या धाकड चित्रपटाच्या कॅरेक्टरसारखीच तु रिअल लाइफमध्ये देखील धाकड आहेस का?' यावर कंगना म्हणाली , 'असं नाहिये. मी रिअल लाइफमध्ये कोणाला मारणार? माझं लग्न होतं नाहिये कारण लोकांनी काही अफवा पसरवल्या आहेत. 






कंगनाचा धाकड हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता अर्जुन रामपाल, दिव्या दत्ता प्रमुख भूमिका साकारणार आहे. कंगनाचा 'धाकड' सिनेमा हिंदीसह तामिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात कंगना रनौत मुख्य भूमिकेत आहे.  सिनेमात कंगना  एका डिटेक्टिव्हची भूमिका साकारणार आहे. कंगनाचा हा सिनेमा आधी 27 मे रोजी प्रदर्शित होणार होता. पण आता सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. 


हेही वाचा :