Mirzapur Season 3 : अभिनेता पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) आणि  दिव्येंदू शर्मा (Divyenndu Sharma) यांची मुख्य भूमिका असलेल्या मिर्जापूर या वेबसिरिजला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. या सिरिजमध्ये पंकज त्रिपाठीने 'कालीन भैय्या'ची भूमिका वठवली होती. तर दिव्येंदू शर्मा 'मुन्ना भैय्या'ची भूमिका साकारत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. ओटीटी प्लॅटफॉर्मचे (OTT) प्रस्थ वाढल्यानंतर मिर्जापूरच्या मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्या होत्या. दरम्यान, आता मिर्जापूर सिझन 3 2024 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.


मिर्जापूर सिझन 3 च्या शेवटी गुड्डू भैय्याने मुन्ना आणि कालीन भैय्यावर गोळ्या झाडल्या होत्या. मुन्ना भैय्याचा तेथेच शेवट झाला होता. तर कालीन भैय्याला (Kaleen Bhaiya) एका गाडीतून इतर ठिकाणी नेताना दाखवण्यात आले होते. त्यामुळे सिझन 3 मध्ये कालीन भैय्या पुन्हा परतत मिर्जापूरची सत्ता राखणार का? की गुड्डू भैय्या मिर्जापूरचा नवा बाहशहा होणार? असा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनात आहे. पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi), दिव्येंदू शर्मा (Divyenndu Sharma)  आणि अली फजल या तिन्ही अभिनेत्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला होता. त्यामुळे सिझन 3 मध्ये पंकज त्रिपाठी आणि अली फजल हे कोणती स्टोरी पुढे नेणार?  हे सिझन रिलीज झाल्यानंतरच समजणार आहे. 


मिर्जापूर 3 येणार प्रेक्षकांच्या भेटीला (Mirzapur Season 3)


मिर्जापूर सिझन 3 ची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. मिर्जापूरचे 2 सिझन आत्तापर्यंत हिट राहिले आहेत. राजकारण, हिंसाचार आणि प्रेम प्रकरण हा वेबसिरिजचा केंद्र बिंदू राहिलाय. त्यामुळे सिझन 3 मध्ये काही वेगळेपणा असणार का? असे प्रश्नही प्रेक्षकांना पडले आहेत. 2024 मध्ये मिर्जापूरचा तिसरा सिझन रिलीज होण्याची शक्यता आहे. पंकज त्रिपाठी आणि अली फजल यांची तिसऱ्या सिझनमध्ये मुख्य भूमिका असणार आहे. 


पंकज त्रिपाठीने दिली होती अपडेट (Pankaj Tripathi)


मिर्जापूर सिझन 3 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती पंकज त्रिपाठीने दिली होती. "सिझनची शूटींग झाली आहे, फक्त डबिंगचे काम बाकी आहे", असे पंकज त्रिपाठी म्हणाला होता. पंकज त्रिपाठीच्या या वक्तव्यानंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली होती. 2024 मध्ये पंकज त्रिपाठीचा 'मैं अटल हूं' हा सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमामध्ये भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे आयुष्य मोठ्या पडद्यावर दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Deepika Padukone : वयाच्या 37 व्या वर्षी दीपिका पादुकोण आई होणार? म्हणाली,"आम्ही 'त्या' दिवसाची वाट पाहत आहोत"