Bollywood: काजोल आणि ट्विंकल खन्नाचा नवीन शो ‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ सध्या जबरदस्त चर्चेत आहे. या आठवड्याच्या एपिसोडमध्ये कृति सेनन आणि विकी कौशल हे विशेष पाहुणे म्हणून हजर झाले होते. एपिसोडभर हशा, मजेशीर गप्पा आणि भन्नाट किस्स्यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. या भागात काजोलने कृति सेननची उंचीवरून घेतलेली गंमत सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. 

Continues below advertisement


काजोलने कृतीच्या उंचीवरून केली मस्करी 


काजोलनं पुढे सांगितलं, “ काजोल म्हणाली, “मला कृति पहिल्यांदा दिलवालेच्या सेटवर भेटली होती. त्या वेळी मी चष्मा लावलेला नव्हता आणि हैदराबादच्या उन्हात उभी होते. तेव्हा मला वाटलं, ‘हे लांबच लांब कोण चाललंय इथून?’. कारण मला बहुतेक लोकांची ओळख त्यांच्या बॉडी लँग्वेजवरूनच करावी लागायची.” कृतिची उंची मला सर्वात जास्त आश्चर्यचकित करणारी होती. जेव्हा आम्ही एकत्र सीन करत होतो, तेव्हा मला माझी उंची अॅडजस्ट करावी लागायची. म्हणूनच मी दोन प्रकारच्या हिल्स वापरायचे. एक माझी नॉर्मल हिल आणि दुसरी 5.5 इंचांची ‘कृति हिल्स’. जेव्हा आमचं चालतं सीन असायचं, तेव्हा मला ह्या खास हिल्स घालाव्या लागायच्या!” हा एपिसोड म्हणजे खऱ्या अर्थानं हशा, खुलासे आणि फिल्मी तडका यांनी भरलेला प्रवास ठरला आहे. 


दरम्यान, कृतीनं दिलवालेच्या शूटिंगदरम्यानचा एक भयानक अनुभव शेअर केला. ती म्हणाली, “आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो, तिथे माझ्या मेकअप आर्टिस्टला काहीतरी विचित्र जाणवलं. तिच्या खोलीत अचानक नळ आपोआप सुरू झाला आणि सगळे मेकअप प्रॉडक्ट्स खाली पडले. दुसऱ्या दिवशी रोहित सर पैंजण घालून ‘छम-छम-छम’ करत सगळ्यांना घाबरवायला निघाले!”


‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय


काजोल आणि ट्विंकल खन्ना यांचा लोकप्रिय टॉक शो "टू मच" सध्या प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. या शोचं वेगळेपण म्हणजे दर आठवड्याला येणारे नवे खुलासे आणि दोन्ही होस्ट्स काजोल आणि ट्विंकल यांचं बिनधास्त बोलणं. प्रत्येक एपिसोडमध्ये वेगवेगळे सेलिब्रिटी पाहुणे म्हणून येतात आणि आपल्या व्यावसायिक प्रवासाबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील रंजक किस्से उलगडतात. फक्त पाहुण्यांचेच नव्हे, तर होस्ट्स काजोल आणि ट्विंकलही स्वतःबद्दल मोकळेपणाने बोलतात आणि अनेक वेळा त्यांच्या संवादातून नव्या गोष्टी समोर येतात. हशा, गप्पा, आणि मजेशीर गोष्टींनी भरलेला हा शो प्रेक्षकांचं मन जिंकतो आहे. नवीन भागात अभिनेत्री कृति सेनन आणि अभिनेता विकी कौशल हे पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. दोघांनीही शोमध्ये धमाल केली, अनेक मजेशीर अनुभव सांगितले आणि काही गुपितंही उघड केली .