Marathi Actor :  अभिनेता कैलाश वाघमारे (Kailash Waghmare) हा नुकताच गाभ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला या नाटकामुळे कैलाश प्रेक्षकांच्या समोर आला. या नाटकाने एक वेगळा विषय रंगभूमीवर मांडला, ज्याचे यशस्वी प्रयोगही झाले आहे. त्यानंतर कैलाश अनेक सिनेमांमधून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. कैलाश हा मूळचा जालन्याचा आहे. त्यामुळे जालना ते मुंबई असा प्रवास कैलाशसाठी खूप कठीण होता. त्याविषयी कैलाशने भाष्य केलं आहे. 


कैलाशने इट्स मज्जा या युट्यब चॅनलला मुलाखत दिली. त्याच्या भाषेवरुन होणाऱ्या टिप्पणीवरही कैलाशने भाष्य केलं आहे. 'पूर्वी लोक माझ्या भाषेमुळे माझ्यावर हासायचे', असं म्हटलं.  लाशची आगळ्यावेगळ्या विषयीची निवड ही कायमच चर्चेत असते. नुकताच आलेला गाभ हा सिनेमा देखील तसाच काहीसा होता. 


आपण काहीतरी जगावेगळं करतोय असं वाटायला लागलं - कैलाश वाघमारे


भाषेच्या मुद्द्यावरुन बोलताना कैलाशने म्हटलं की, मी जालन्यात जेव्हा शिक्षणासाठी आलो त्यावेळी तिथेही आजूबाजूला माझीच भाषा बोलणारे होते. त्यामुळे तेव्हाही मला माझ्या भाषेमुळे काही अडचण नाही आली. तेव्हा मग मी कथाकथन, काव्यवाचन अशा सगळ्या स्पर्धा करायचो, तिथे बक्षीसं मिळायची, त्यानंतर पेपरमध्ये फोटोही छापून यायचे. मग गावाला वाटायला लागलं ही आपलं पोरगं काहीतरी चांगलं काम करतोय, त्यांना ते खूप भारी वाटायला लागलं. मग ते मलाही भारी वाटायला लागलं आणि आपण काहीतरी जगावेगळं करतोय, असंही वाटाला लागलं. 


तेव्हा नाटक शिकण बाजूलाच राहिलं - कैलाश


पुढे त्याने म्हटलं की,  पण या सगळ्यादरम्यान मला एक गोष्ट मात्र नक्की जाणवली की, कुणीही माझ्यापेक्षा वेगळं काही करत नाहीये. सगळेजण त्यांच्या मातीशी जोडलेले आहेत. पण जेव्हा मी मुंबई विद्यापीठात आलो, तेव्हा ते आणि पाणी वैगरे सगळं आलं. त्यावेळी शिकण्या शिकण्यातच माझी दोन वर्ष गेलीत. तिथे नाटक शिकणं राहिलं बाजूला आणि त्यांचं लाईफस्टाईल जुळवून घेणं, ती भाषा जुळवून घेणं, त्या शहराशी जुळवून घेणं यातच दोन वर्ष गेलीत. त्यामुळे नाटक शिकणं बाजूलाच राहिलं. त्यानंतर मी भाषेचं उसनं आवसान आणायचो. उगाच नको तिथे काहीही बोलायचो. तेव्हा लोकं हासायचे मला. पण मला काळायचंच नाही, ते माझ्यावर का हसत आहे. पण नंतर मला कळालं की आपण जे बोलतोय ते चुकीचं आहे. 


ही बातमी वाचा : 


Ashok Saraf : अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांनी जुगलबंदी, बहुचर्चित 'लाईफलाईन' सिनेमाचा ट्रेलर रिलीज