Kaagaz 2 Trailer : अभिनेते सतीश कौशिक यांनी काही महिन्यांपूर्वीच जगाचा निरोप घेतला. दरम्यान, 'कागज 2' (Kaagaz 2) हा सिनेमा सतीश कौशिक यांचा अंतिम सिनेमा ठरलाय. सिनेमाच्या टीझरमध्ये मुलीच्या ह्रदय पिटाळून ठेवणाऱ्या मृत्यूचे कारण दाखवण्यात आले आहे. अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी या सिनेमाचा ट्रेलर शेअर केलाय. अनुपम खेर (Anupam Kher) यांनी सिनेमाचा ट्रेलर शेअर करत कौशिक यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 


'कागज 2' चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला 


टीझर पाहिल्यानंतर समजते की, राजकारणाच्या वादातून कोणाचा मृत्यू जरी झाला तरी कोणाला फरक पडत नाही. प्रत्येकाल वैयक्तिक रॅले आणि इलेक्शन कॅम्पेनमध्ये इंटरेस्ट असतो. एक बाप कशापद्धतीने आपल्या मुलीसाठी लढतो. मुलीसाठी न्यायालयात जाऊन बाजू मांडतो, हे दाखवण्यात आले आहे. अतिशय गंभीर समस्येवर हा सिनेमा बनवण्यात आलाय. सिनेमात अनुपम खेर सतीश कौशल यांचे वकिल बनतात. त्यांच्यामुळे सिनेमात क्लायमॅक्स निर्माण होतो. न्यायमूर्तींसमोर युक्तीवाद करत कशा पद्धतीने अनुपम खेर आपल्या क्लायंटला न्याय मिळवून देतात हे पाहणे प्रेक्षकांसाठी औत्सुक्याचे ठरणार आहे. दर्शन कुमार हे या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. 






मार्च 2023 मध्ये कौशिक यांचे झाले होते निधन 


सतीश कौशलचा हा यांचा हा शेवटचा सिनेमा असणार आहे. कौशिक यांचे 9 मार्च 2023 रोजी निधन झाले होते. ते त्यावेळी 67 वर्षांचे होते. सोशल मीडियावरुन श्रद्धांजली वाहत असताना अनुपम खेर यांनी त्यांच्या निधनाची बातमी दिली होती. सतीश कौशिक यांचा जन्म 1956 मध्ये हरियाणा येथे झाला होता. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथे सतीश कौशिक आणि अनुपम खेर यांची मुलाखत झाली होती. सतीश यांनी 1982 मध्ये मासूम या सिनेमातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. सतीश कौशिक यांनी मिस्टर इंडिया, दीवाना मस्ताना, साजन चले ससुरालसह अशा अनेक सिनेमांमध्ये महत्वाच्या भूमिका निभावल्या आहेत. याशिवाय  रूप की रानी चोरों का राजा, प्रेम, हम आपके दिल में रहते है आणि तेरे नाम या सिनेमांचे त्यांनी दिग्दर्शन केलय. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Virat Kohli AB devilliers : डिव्हिलियर्स कधी नव्हे तो जिवलग विराट कोहलीवर बोलून गेला आणि माफी मागायची वेळ आली!