Jui Gadkari on Tharla Tar Mag serial End : स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठरलं तर मग' मालिका सध्या वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेत प्रियाचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी स्टार प्रवाह वाहिनीवरील 13 नायिका एकत्र आल्या आहेत. प्रियाचं सत्य सुभेदार कुटुंबीयांना कळणार आहे. सुभेदार कुटुंबीयांसमोर प्रियाचा खोटेपणा उघड झाला तर ही मालिका संपणार का? असा प्रश्न सध्या चाहत्यांना पडलाय. पण आता या सगळ्या प्रश्नांचे उत्तर या मालिकेची अभिनेत्री जुई गडकरीने दिलं आहे. अल्ट्रा बझ मराठीशी तिने याविषयी संवाद साधलाय. (Jui Gadkari On Tharla Tar Mag Serial)
ठरलं तर मग मालिका संपणार?
'ठरलं तर मग' मालिका आता निर्णयक क्षणावर पोहोचली आहे. मालिकेत आता प्रियाचं सत्य समोर आल्यानंतर मालिका संपणार का ? असा सवाल विचारला जात असताना जुईने सांगितलं ' सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रियाचं सत्य समोर आल्यानंतर मालिका संपणार नाहीय. अजून एक महत्त्वाचा टप्पा बाकी आहे.'आता काहीच ट्विस्ट नाहीये. प्रियाचं सत्य समोर आणण्यासाठीच आम्ही 13 जणी एकत्र आहोत.आमच्या सुभेदारांच्या घरातही सर्वांना समजणार आहे की, प्रिया काय आहे, तिने आजवर काय केलंय. आता मी सांगू शकते, प्रतीक्षा संपलीये. मालिका संपून जाईल असं काहीच नाही. यात अजूनही अनेक भाग आहेत. प्रियाचं सत्य समोर येणं हा एक वेगळा भाग आहे.
मालिकेत पुढे काय घडणार याबद्दल बोलताना जुई म्हणाली, " मालिका संपणार नाही कारण प्रियाचा खरा चेहरा समोर आला तरी मी तन्वी आहे, हे अजून घरात कोणालाच माहीत नाहीये. त्यामुळे मालिका संपणार नाही. थोडासा मधुबाव निर्दोष आहेत तसेच प्रियाचं खरं रूप समोर येणं हा मालिकेचा एक भाग आहे. त्यानंतर सायली कनभी आहे हा खूप महत्त्वाचा भाग देखील समोर येईल ' असं जुई गडकरी म्हणाली.
