Aamir Khan Confirms 3 Idiots Sequel: 2008 साली रिलीज झालेल्या '3 इडियट्स' (3 Idiots) या सिनेमाचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. या सिनेमातून नवीन पिढीला एका शिकवण मिळाली. या चित्रपटातील आमिर खान (Amir Khan), आर. माधवन (R. Madhavan) आणि शरमन जोशी (Sharman Joshi) या तिघांची जोडी प्रेक्षकांना आवडली. हा सिनेमा अजूनही आवडीने पाहिला जातो. दरम्यान, या चित्रपटाचा दुसरा पार्ट कधी रिलीज होणार? असा प्रश्न अनेकदा प्रेक्षकवर्गाकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, चित्रपटाच्या सिक्वेलबाबत (Entertainment) एक मोठी अपडेट समोर येत आहे. आमिर खानने यावर प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्याने '3 इडियट्स'च्या सिक्वेलवर मोठी हिंट दिली आहे. '3 इडियट्स 2' लवकरच मोठ्या पडद्यावर येईल, तसेच या चित्रपटाची स्क्रीप्ट तयार झाली आहे, असं आमिर म्हणाला.
'3 इडियट्स' च्या सिक्वेलवर आमिर खान नेमकं काय म्हणाला? (Aamir Khan confirms 3 Idiots sequel script ready)
एका सिनेमाच्या प्रोमोशन कार्यक्रमादरम्यान, आमिर खानने या सिनेमाविषयी खुलासा केला. '3 इडियट्स'मधील प्रसिद्ध त्रिकूट पुन्हा येण्यास तयार आहे, असं आमिर म्हणाला. यामुळे त्याच्या चाहत्यांना आनंद झाला. या प्रोजेक्टवर सध्या काम सुरू आहे, अशी माहिती देखील आहे. 'चित्रपटाची टीम सध्या डेव्हलपमेंटवर काम करत आहे. या सिनेमाची स्टोरी ऐकली आहे. या सिनेमाची स्टोरी पूर्ण वेगळी आहे', अशी माहिती आमिर खानने दिली.
आमिर खानने चाहत्यांना दिली हिंट, '3 इडियट्स' चा सिक्वेल कधी रिलीज होणार? (3 Idiots Sequel Big Update)
यावेळी आमिर खानने हे देखील कन्फर्म केलं की, सीक्वेलचे पहिल्या पार्टशी कनेक्शन असेल. जरी स्क्रीनप्लेवर काम सुरू असले तरी, या सिनेमाचा पाया स्टोरीमुळे भक्कम झाला आहे. या सिनेमाची कथा जवळपास दशकभरानंतर त्याच पात्राला पुढे नेते. यावेळी आमिर खानने असेही म्हटले होते की, फुन्सुख वांगडूच्या भूमिकेतून मोठ्या पडद्यावर परत येण्यास उत्सुक आहे. राजकुमार हिरानीसोबत काम करण्यासही उत्सुक असल्याचं आमिर म्हणाला. आमिर खानने शेअर केलेल्या हिंटमुळे चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. तसेच सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्यामुळे आनंदही व्यक्त केला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
